कोकणच्या तोंडाला पाने पुसाल तर कोकण तुम्हाला जागा दाखवेल.... - If you wipe the leaves from Konkan's mouth, Konkan will show you the place | Politics Marathi News - Sarkarnama

कोकणच्या तोंडाला पाने पुसाल तर कोकण तुम्हाला जागा दाखवेल....

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 4 मार्च 2021

मासेमारीच्या बाबत कोकणासाठी इंटिग्रेटेड प्लॅन तयार करावा. पालघरलाही पर्यटनासाठी स्कोप आहे. रायगड, अलिबाग गड किल्ले आहेत, मंदीरे आहेत, देवस्थाने आहेत. रत्नागिरी, सिंधूदूर्ग येथे ही पर्यटन आहे. कधीतरी न्यायी योजना राबवा, असे सांगून कोकणसाठी पाच एक हजार कोटींचे पॅकेज करून नियोजित पर्यटन विकासाचा कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी त्यांनी केली.

सातारा : कोकण व सिंधुदूर्गचा दोनशे कोटींचा आराखडा तयार केला पण पैसेच दिले पाहीत. केवळ कागदावर आराखडा दाखवून कोकणाच्या तोंडाला आजपर्यंत पाने पुसली. कोकणच्या तोंडाला पाने पुसाल तर कोकण तुम्हाला जागा दाखवेल, असा इशारा देऊन कोकणसाठी पाच एक हजार कोटींचे पॅकेज देऊन पर्यटन विकासाचा कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सभागृहात केली. 

विधान परिषदेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेत श्री. दरेकर बोलत होते. त्यांनी कोकणच्या रखडलेल्या पर्यटन विकासाच्या मुद्द्यावरून मंत्री एकनाथ शिंदे, भाई जगताप, शंभूराज देसाईंना कोपरखळ्या मारल्या. श्री. दरेकर म्हणाले, कोकणच्या विषयांकडे सभागृहाचे लक्ष वेधत आहे. कोकणाने आजपर्यंत शिवसेनेला ताकद, उभारणी व पाठबळ देण्याचे काम केले. पण या
कोकणासाठी शिवसेनेने कुठलीही भरीव तरतूद केलेली नाही.

येथील विविध प्रकल्प अपूर्ण आहे. कोकणात महामार्गाचे काम सुरू आहे. गोवा महामार्ग अर्धवट अवस्थेत आहे. रायगड, रत्नागिरी गोवा महामार्ग अनेकवर्षे प्रलंबित आहे. एकनाथ शिंदे यांना माझी नम्र विनंती आहे. मुख्यमंत्र्यांनंतर वजनदार मंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. एखादा विषय पोटतिडकीने मांडल्यास दाद देतात. त्यांच्याकडे विषय आल्यावर ते राजकारण व पक्षाच्या पलिकडे जाऊन मार्गी लावतात. तुम्ही कोकणाला विसरला की तुमचा कार्यभार संपला, ही वेळ आणू नका, असा इशारा त्यांनी दिला. केवळ दोनशे कोटींचा प्रश्न आहे.

या अधिवेशनात भाई तुम्ही पुरवणी मागण्यांना उत्तर देताना मान्य करा. कोकणची जनता तुम्हाला दुवा देईल. मुंबई गोवा महामार्ग रखडला आहे. जनतेत चर्चा आहे की आम्ही ज्यांना साथ दिली. त्या पक्षाचे मुख्यमंत्री असताना काम मार्गी का लागत नाही. हा विषय टाईमाबॉण्ड पध्दतीने मार्गी लावावा. अशी मागणी त्यांनी केली. वैधानिक विकास महामंडळाबाबत बोलताना दरेकर म्हणाले, विदर्भ, मराठवाडा विकास महामंडळाला मुदतवाढीसाठी आग्रही भूमिका घेतली. यासाठी फडणवीसांसह इतर भाजप नेत्यांनी भूमिका घेतली.

बॅकलॉग भरण्याची तरतूद या महामंडळाच्या माध्यमातून दिली जाते. त्यानुसार वर्षभर मुदतवाढ दिली होती. पैशाची तरतूद करण्याचे अर्थमंत्र्यांना सांगितले आहे. बजेटमध्ये तरतूद करतील. मराठावाडा, विदर्भासारखे कोकणसाठीही वैधानिक विकास महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. प्रत्येक वेळी कोकणच्या तोंडाला पाणी पुसली जातात. मच्छीमारी, पर्यटन विषयावर बोलताना श्री. दरेकर म्हणाले, कोकणसाठी स्वतंत्र्य वैधानिक विकास महामंडळाची स्थापना करावी.

मासेमारीच्या बाबत कोकणासाठी इंटिग्रेटेड प्लॅन तयार करावा. पालघरलाही पर्यटनासाठी स्कोप आहे. रायगड, अलिबाग गड किल्ले आहेत, मंदीरे आहेत, देवस्थाने आहेत. रत्नागिरी, सिंधूदूर्ग येथे ही पर्यटन आहे. कधीतरी न्यायी योजना राबवा, असे सांगून कोकणसाठी पाच एक हजार कोटींचे पॅकेज करून नियोजित पर्यटन विकासाचा कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी त्यांनी केली.
 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख