फॅमिली प्लॅनिंग केले असते, तर लस कमी पडली नसती... - If family planning had been done, the vaccine would not have been reduced says MP Udayanraje Bhosale | Politics Marathi News - Sarkarnama

फॅमिली प्लॅनिंग केले असते, तर लस कमी पडली नसती...

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 8 एप्रिल 2021

लसीच्या पुरवठ्यासाठी मी आरोग्य मंत्री व मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे, असे त्यांनी सांगितले. लसीबाबत राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवतंय, या प्रश्‍नावर ते म्हणाले, बोट दाखवून उपयोग नाही. लोकसंख्येचा भाग आहे कितीही केले तरी कमीच पडणार आहे.

सातारा : माझा पहिल्या दिवसांपासून लॉकडाऊनला विरोध आहे, असे सांगून उदयनराजे म्हणाले, व्हायरस कोणत्या कालावधीत बाहेर येतो कोणत्या कालावधीत झोपलेला असतो, असे म्हणता येणार नाही. प्रत्येकाने लस घ्यावी. पण प्रत्येकाने फॅमिली प्लॅनिंग केले असते तर आज लसीचा तुटवडा जाणवला नसता आणि ही परिस्थिती निर्माण झाली नसती, असा घाणाघात साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हा प्रशासन व राज्य सरकारवर केला आहे.  

राज्यात सध्या कोरोना लसीचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर उदयनराजेंना छेडले असता ते म्हणाले, आपल्या देशाची लोकसंख्या जास्त आहे. महाराष्ट्राला जास्त दिले आणि कुठल्या राज्याला कमी दिले जाते हा वाद निर्माण करू नका. महाराष्ट्राला जास्त कशाला मिळाले पाहिजे. प्रत्येक राज्याच्या लोकसंख्येच्या क्षमतेप्रमाणे लस दिली पाहिजे.

माझा पहिल्या दिवसांपासून लॉकडाऊनला विरोध आहे, असे सांगून उदयनराजे म्हणाले, व्हायरस कोणत्या कालावधीत फिरत नाही कोणत्या कालावधीत झोपलेला असतो, असे म्हणता येत नाही. प्रत्येकाने लस घ्यावी. पण प्रत्येकाने फॅमिली प्लॅनिंग केले असते तर आज ही परिस्थिती निर्माण झाली असती का, असा प्रश्न उपस्थित करून उदयनराजे म्हणाले, मध्यंतरी मला एकजण म्हणाला महाराज सातारा महापालिका जाहीर करून टाका.

आरे लोकसंख्या कोण मी एकटा वाढविणार का, बाकीच्या देशांची लोकसंख्या बघा आणि आपली बघा. लसीच्या पुरवठ्यासाठी मी आरोग्य मंत्री व मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे, असे त्यांनी सांगितले. लसीबाबत राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवतंय, या प्रश्‍नावर ते म्हणाले, बोट दाखवून उपयोग नाही. लोकसंख्येचा भाग आहे कितीही केले तरी कमीच पडणार आहे.
लसीबाबत गुजरात व महाराष्ट्रात दुजाभाव होत आहे का, यावर उदयनराजे म्हणाले, कोणी सांगितले तुम्हाला, तुमच्याकडे याचे आकडे आहेत का ते दाखवा मग बघू.

पश्‍चिम बंगालमध्ये निवडणूक आहे, तेथे कोरोना येत नाही का, या प्रश्‍नावर उदयनराजे म्हणाले, एवढेच तुम्हाला वाटते तर बंगालची निवडणूक पुढे ढकला तसेच स्पर्धा परिक्षाही पुढे ढकलला. त्यावर सातारा पालिकेची निवडणूक लवकर घ्या म्हणजे कोरोना निघून जाईल, असे तुम्हाला वाटते का, असा प्रश्न पत्रकारांनी करताच उदयनराजे म्हणाले, तुम्ही मला कोरोनाची उपमा देताय का, असा प्रश्‍न करताच एकच हशा पिकला. भिडे गुरूजींच्या वक्तव्यावर उदयनराजेंना विचारले असता ते म्हणाले, माझे प्रश्‍न मला विचारा, कोण काय म्हणाले ते मला विचारू नका. ते ज्या अँगलने बोलले त्यांनाच माहिती आहे. हवे तर मी त्यांच्याशी चर्चा करूनच
बोलीन. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख