सतेज पाटलांच्या वाढदिनी मास्क वापरा पॅटर्न; ५० लाख लोकांनी दिला प्रतिसाद - I use a mask, you use it too .. this is good luck for me says Minister Satej Patil | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

सतेज पाटलांच्या वाढदिनी मास्क वापरा पॅटर्न; ५० लाख लोकांनी दिला प्रतिसाद

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 12 एप्रिल 2021

सतेज पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन सर्वसामान्य लोकांना एक लाख मास्क वाटप करण्याचे नियोजन केले आहे. युवक काँग्रेस आणि एनएसयूआयचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी कोल्हापूरातील भाजी विक्रेते, फळ विक्रेते तसेच रस्त्यावरील कष्टकरी यांना मास्कचे वाटप केले. कोरोना काळातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता मंत्री पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आपल्या कोरोना काळातील वाढदिवसाचा विधायक पॅटर्न तयार केला आहे. मी मास्क वापरतो, तुम्ही सुध्दा वापरा.. याच माझ्यासाठी शुभेच्छा, या त्यांनी केलेल्या आवाहनाला राज्यभरातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी व्हिडीओतून तसेच सोशल मीडियाद्वारे त्यांना शुभेच्छा देत प्रतिसाद दिला. 

सोशल मीडियावर सकाळपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तब्बल पन्नास लाख लोकांपर्यंत ही मोहिम पोहोचली. याबरोबरच कार्यकर्त्यांनी कोल्हापूरातील भाजी विक्रेते, फळ विक्रेते तसेच रस्त्यावरील कष्टकरी यांना मास्कचे वाटप सुध्दा केले. गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे दरवर्षी वह्यांच्या स्वरुपात शुभेच्छा स्विकारतात. गेल्या 13 वर्षात 65 लाखांहून अधिक वह्यांचे जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या शाळांत वाटप केले आहे.

पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वाढदिवसाला सामाजिक जाणीवेची जोड दिली. लोकांच्या सुरक्षिततेचा विचार करुन मंत्री पाटील यांनी प्रत्यक्ष शुभेच्छा स्विकारल्या नाहीत. त्याऐवजी "मी मास्क वापरतोय, तुम्हीही वापरा" याच माझ्यासाठी शुभेच्छा, असे आवाहन केले. या आवाहनाला राज्यातील विविध पक्षातील मातब्बर नेत्यांबरोबरच कार्यकर्त्यांनी सुध्दा उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. या सर्वांनी मास्क घातलेले व्हिडीओ आणि त्यासोबत संदेश सोशल मीडियावर पोस्ट केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्याच्या मंत्रीमंडळातील बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, जयंत पाटील, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे-पाटील, अनिल परब, जितेंद्र आव्हाड, डॉ. नितीन राऊत, एकनाथ शिंदे, विजय वडेट्टीवार, सुभाष देसाई, वर्षा गायकवाड, खासदार सुप्रिया सुळे, राजीव सातव, संजय राऊत, मंत्री बच्चू कडू, धनंजय मुंडे, नवाब मलिक, आदित्य ठाकरे, उदय सामंत, यशोमती ठाकूर, दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, खासदार अमोल कोल्हे, श्रीनिवास पाटील, मंत्री राजेश टोपे, आमदार भाई जगताप, जिग्नेश मेवारी, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, इम्रान प्रतापगडी, रितेश देशमुख, यांच्यासह आमदार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

सतेज पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन सर्वसामान्य लोकांना एक लाख मास्क वाटप करण्याचे नियोजन केले आहे. युवक काँग्रेस आणि एनएसयूआयचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी कोल्हापूरातील भाजी विक्रेते, फळ विक्रेते तसेच रस्त्यावरील कष्टकरी यांना मास्कचे वाटप केले. कोरोना काळातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता मंत्री पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागातील विविध ठिकाणी झालेल्या रक्तदान शिबीरात 500 हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. पुढे आठवडाभर ही मोहीम सुरुच राहणार आहे. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख