मी ठेकेदारांकडून कधीच पैसे घेत नाही, काम केले नाही तर कारवाई करतो......  - I never take money from contractors, I take action if work is not done ...... | Politics Marathi News - Sarkarnama

मी ठेकेदारांकडून कधीच पैसे घेत नाही, काम केले नाही तर कारवाई करतो...... 

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 18 जून 2021

बुटीबोरीत चांगली शाळा महाविद्यालये, लोकांसाठी चांगला बाजार, परवडणारी घरे बनावी. एक आदर्श टाऊनशिप म्हणून या शहराचा विकास व्हावा व राज्यातील सुंदर शहर बनावे म्हणून काम करण्याची गरज असल्याचे गडकरी म्हणाले.

नागपूर : बुटीबोरी-वर्धा-यवतमाळ-लातूर-तुळजापूर हा रस्ता जगातील सुंदर रस्ता झाला आहे. पण या रस्त्यावर झाडे लावलेली नसल्याने मी त्या ठेकेदाराची बिले रोखली आहेत. अग्रवाल साहेब या रस्त्यावर झाडे लावल्याशिवाय त्याचे एकही बिल देऊ नका, त्यावर कारवाई करा, असे सांगितले होते. त्यावर ठेकेदाराने ८० हजार खड्डे काढून तीन मीटर उंचीची मोठी झाडे लावण्याची तयारी केली आहे. मुळात मी ठेकेदारांकडून कधीच पैसे घेत नाही. आता जर त्याने काम केले नाही तर त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारणार, असा सज्जड दम केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari यांनी ठेकेदाराला भरला आहे. I never take money from contractors, I take action if work is not done ......

जिल्ह्याचे औद्योगिक परिसर असलेल्या बुटीबोरी ते नागपूर मार्ग सहापदरी करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली. यावेळी त्यांनी हा मार्ग सहा महिन्यात पूर्ण होईल तसेच बुटीबोरी नगर परिषद आपण दत्तक घेणार असल्याचेही सांगितले. बुटीबोरी उड्डाणपुलाच्या लोकार्पण समारंभप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी खासदार कृपाल तुमाने,  विकास महात्मे, आमदार समीर मेघे, गिरीश व्यास, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, माजी आमदार सुधीर पारवे, अ‍ॅड. सुलेखाताई कुंभारे, बबलू गौतम, चरणसिंग ठाकूर, डॉ. राजीव पोतदार, अशोक धोटे, संध्या गोतमारे, आकाश वानखेडे, प्रवीण शर्मा, आतीष उमरे, दिलावर खान, अविनाश गुजर आदी उपस्थित होते.

हेही वाचा : ..तर भविष्यात काँग्रेसला वगळून महाविकास आघाडी : बड्या नेत्याचे संकेत

नितीन गडकरी म्हणाले, अत्यंत महत्त्वाचा हा उड्डाणपूल आहे. हे स्थळ अपघातप्रवण होते. इतर उड्डाणपुलांच्या तुलनेत या पुलाचे काम उत्तम झाले आहे. बुटीबोरी ही राज्यातील आदर्श नगर परिषद बनावी या दृष्टीने एक विकास आराखडा तयार केला जावा. येत्या पाच वर्षात नागपूरला ‘ग्रीन नागपूर’ बनवू. ध्वनी प्रदूषण, हवेतील प्रदूषण आणि पाण्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी काम केले जात आहे. तसेच सीएनजीचा पंप बुटीबोरीत लावण्याचाही आपला प्रयत्न आहे. ट्रक आणि बसेस सीएनजीवर चालल्या तर प्रदूषण कमी होईल. 

आवश्य वाचा : मंत्री आहात तर तुम्ही काय करता ! हजारे यांचे जितेंद्र आव्हाड यांना सडेतोड उत्तर

बुटीबोरीत चांगली शाळा महाविद्यालये, लोकांसाठी चांगला बाजार, परवडणारी घरे बनावी. एक आदर्श टाऊनशिप म्हणून या शहराचा विकास व्हावा व राज्यातील सुंदर शहर बनावे म्हणून काम करण्याची गरज असल्याचे गडकरी म्हणाले. बॉक्स अंबाझरी ते पारडी नावेतून नागपुरात नागनदी सौंदर्यीकरणासाठी २२०० कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. येत्या दोन तीन वर्षात अंबाझरी ते पारडी हा प्रवास आपण नावेतून करणार आहोत. पर्यनाच्या दृष्टीने नागनदीचा विकास करण्यात येत आहे.

बुटीबोरी-वर्धा-यवतमाळ-लातूर-तुळजापूर हा रस्ता जगातील सुंदर रस्ता झाला आहे. पण या रस्त्यावर झाडे लावलेली नसल्याने मी त्या ठेकेदाराची बिले रोखली आहेत. अग्रवाल साहेब या रस्त्यावर झाडे लावल्याशिवाय त्याचे एकही बिल देऊ नका, त्यावर कारवाई करा, असे सांगितले होते. त्यावर ठेकेदाराने ८० हजार खड्डे काढून तीन मीटर उंचीची मोठी झाडे लावण्याची तयारी केली आहे. मुळात मी ठेकेदारांकडून कधी पैसे घेत नाही. आता जर त्याने काम केले नाही तर त्याला झोडपून काढू, असा सज्जड दमही त्यांनी भरला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख