मी महाविकासचा गुलाम नाही; सरकार चुकेल तिथं ठामपणे बोलणार....

मी पॅकेज देणारामाणूसनाही, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. पण पूरग्रस्तांना सरकारकडून काहीच मिळाले नाही. पुनर्वसन करणार होते. पण पुनर्वसनाबाबत सरकारची व्यापाऱ्यांची भूमिका झाली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
मी महाविकासचा गुलाम नाही; सरकार चुकेल तिथं ठामपणे बोलणार....
I am not a slave of Mahavikas Aghadi: Raju Shetty

सांगली : मी महाविकास आघाडीचा गुलाम नाही. जिथं सरकार चुकतंय तिथे मी सरकारविरोधात ठामपणाने बोलणार, असे स्पष्ट मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी व्यक्त केले. I am not a slave of Mahavikas Aghadi : Raju Shetty

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये आज पूरग्रस्तांसाठी सर्व पक्षिय 'जनआक्रोश' मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्यासंख्येने शेतकरी, सर्व पक्षिय नेते आणि पूरग्रस्त उपस्थित होते. यावेळी राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदारपणे टीका केली. तसेच पूरग्रस्तांना मदत देताना सरकार चुकलंय त्यामुळे मी रस्त्यावर उतरलो आहे, असे त्यांनी सांगितले. 

मी महाविकास आघाडीचा गुलाम नाही, असे स्पष्ट करून शेट्टी  म्हणाले, महाविकास आघाडी निर्माण करणाऱ्यापैकी मी एक आहे. पण, मी आजही महाविकास आघाडीमध्ये आहे. मात्र, पूरग्रस्तांना मदत देताना सरकार चुकलंय, असेही ते म्हणाले. 

मी पॅकेज देणारा माणूस नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. पण पूरग्रस्तांना सरकारकडून काहीच मिळाले नाही. पुनर्वसन करणार होते. पण पुनर्वसनाबाबत सरकारची व्यापाऱ्यांची भूमिका झाली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.  

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in