मी जावळीतलाच; मला घेरण्याचा प्रयत्न करू नका, माझ्या पाठीशी पवारांचा आशीर्वाद...  

काहीही झाले तरी माझी जावळीतून उमेदवारी नक्की असल्याचा ठाम विश्वासही आमदार शशीकांत शिंदे यांनी या वेळी व्यक्त केला.
Shashikant shinde critisize on Shivendraraje
Shashikant shinde critisize on Shivendraraje

कुडाळ : मी निवडणुकीपूरता जावळी तालुक्यात येत नसतो, तर मी इथलाच असतो. या मातीशी माझी नाळ जोडलेली आहे. माझ्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे कार्यक्षेत्र आहे. आतापर्यंत जावळीत सर्व काही वातावरण चांगले होते म्हणून फारसे लक्ष देत नव्हतो. मात्र, यापुढे जावळी तालुक्यात यावे लागेल. मला कोणी घेरण्याचा प्रयत्न करू शकत नाही. कारण माझ्या पाठीशी शरद पवार यांचा आशीर्वाद आहे, असा आमदार शशिकांत शिंदे यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नाव न घेता कुडाळ येथे एका कार्यक्रमप्रसंगी बोलताना पलटवार केला. I am from Jawali; Don't try to surround me, Pawar's blessings on my back ...

कुडाळ येथील पिंपळबन बाल उद्यान लोकार्पण सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी सर्जापूर येथे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शशिकांत शिंदे यांचे नाव न घेता निवडणुकीपुरते जावळीत येणाऱ्यांना भुलू नका, असा घणाघात केला होता. त्यालाच प्रतिउत्तर देताना आज श्री. शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. 

ते म्हणाले, 'शशिकांत शिंदे हा नेहमीच संघर्ष करत आलेला लढवय्या आहे. माझा राजकीय प्रवासाचा उदय जावळीतूनच सुरू झाला असून, राजकारणात सगळेच पत्ते आताच ओपन करायचे नसतात. वेळ आल्यावर कोणता पत्ता कधी टाकायचा हे मला चांगलेच माहीत आहे. जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. निवडणूक होईल किंवा नाही हे ज्या त्या वेळी ठरेल. मात्र, लढणे हे शशिकांत शिंदे यांच्या रक्तात आहे. त्यामुळे लढाई कोणतीही असो मी मागे हटत नाही.'

काहीही झाले तरी माझी जावळीतून उमेदवारी नक्की असल्याचा ठाम विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला. या वेळी खासदार श्रीनिवास पाटील, जावळी पंचायत समितीचे उपसभापती सौरभ शिंदे, माथाडी कामगार नेते ऋषिकांत शिंदे आदी उपस्थित होते. गेल्या दोन दिवसांत जावळीच्या आजी- माजी आमदारांमध्ये रंगलेल्या कलगी तुऱ्यामुळे जावळीतील राजकीय वातावरण काही प्रमाणात ढवळून निघाले आहे, त्याचे पडसाद दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमधून सोशल मीडियावर आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com