नितीन गडकरी यांच्या मताशी मी सहमत : एकनाथ खडसे

गडकरी यांनी म्हटले आहे की, आज जगभरात परिस्थिती हलाखीची आहे, त्यामुळे आशा काळात कोणी राजकारण करू नये. सर्वांनी एकत्र येऊन कोरोनाशी लढा द्यावा लागला अशी भूमिका त्यांनी मांडली.
नितीन गडकरी यांच्या मताशी मी सहमत : एकनाथ खडसे
I agree with Nitin Gadkari: Eknath Khadse

जळगाव : सारखी सारखी टीका केल्यामुळे यंत्रणा नाउमेद होतात. प्रशासनावर परिणाम होतो. त्यामुळे अशा काळात टीका करू शकत नये, असे नितीन गडकरी (Nitin Gadkari) सांगितले आहे. त्यांच्या मताशी मी सहमत आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी व्यक्त केले. (I agree with Nitin Gadkari: Eknath Khadse)

भारतीय जनता पक्षाचे नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सह सर्व जणांना कोरोना काळात राजकारण न करण्याबाबत सल्ला दिला आहे. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना खडसे म्हणाले, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना काळात राज्य सरकार उपाय करण्यात अपयशी ठरले असल्याचा आरोप केला.

मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य सरकारच्या कामाचे कौतुक केलं आहे, यावर तुमची प्रतिक्रिया काय असा प्रश्न केला असता खडसे म्हणाले, या सर्वांचे उत्तर नितीन गडकरी यांनी दिले आहे, त्यामुळे मला नव्याने सांगण्याची गरज वाटत नाही. गडकरी यांनी म्हटले आहे की, आज जगभरात परिस्थिती हलाखीची आहे, त्यामुळे आशा काळात कोणी राजकारण करू नये. सर्वांनी एकत्र येऊन कोरोनाशी लढा द्यावा लागला अशी भूमिका त्यांनी मांडली.

हीच भूमिका मी सुद्धा मांडली होती, त्यावेळी मी म्हटले होते आजच्या काळात राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन कार्य करावे. त्यामुळे मलाही असे वाटते की आजच्या काळात सर्वांनी एकत्र येऊन सरकारला मदत करावी नुसतच न बोलता ते आपल्या कृतीतून दाखवून द्यावे. उगाचच दररोज काही झालं की टीका करणे हे बंद केले पाहिजे. दररोज आले की टीका करणे यामुळे यंत्रणा नाउमेद होते असे गडकरी यांनी म्हटले आहे मी त्याच्याशी सहमत आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in