लस मिळत नसताना लसीकरणात महाराष्ट्र देशात पहिल्या नंबरला कसा : आमदार गोरेंचा सवाल

आजच्या घडीला लसीकरणाचा विषय सर्वात मोठा आहे. लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी होत आहे. परंतू कोल्हापूरचा माणूस फलटणमध्ये लस घेतोय आणि फलटणच्या माणसाला लसच मिळत नाही, अशी परिस्थिती असल्याचे आमदार जयकुमार गोरे यांनी निदर्शनास आणून दिले.
लस मिळत नसताना लसीकरणात महाराष्ट्र देशात पहिल्या नंबरला कसा : आमदार गोरेंचा सवाल
How Maharashtra ranks first in the country in vaccination when there is no vaccine: MLA Gore's question

फलटण शहर : फलटण शहरातील लसीकरण केंद्रावर व्यवस्थापण नीट होत नसल्याने फलटण तालुक्यातील व त्या त्या लसीकरण केंद्रावर लोकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कोल्हापूरचा (kolhapur)माणूस फलटणला (Phaltan) लस घेतोय अशा शब्दात लसीकरणावर निशाणा साधत, लोकांना लस मिळत नसताना लसीकरणात देशात महाराष्ट्र  (Maharashtra) पहिल्या नंबरला कसा, याचा आपण शोध घेत असल्याची उपरोधिक टीकाही आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी केली आहे. (How Maharashtra ranks first in the country in vaccination when there is no vaccine: MLA Gore's question)

फलटण येथे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सुरू केलेल्या 'लोकनेते हिंदूराव नाईक निंबाळकर कोविड केअर सेंटर'चा प्रारंभ औपचारीकपणे आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्या ॲड. जिजामाला नाईक निंबाळकर उपस्थिती होते.

आजच्या घडीला लसीकरणाचा विषय सर्वात मोठा आहे. लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी होत आहे. परंतू कोल्हापूरचा माणूस फलटणमध्ये लस घेतोय आणि फलटणच्या माणसाला लसच मिळत नाही, अशी परिस्थिती असल्याचे निदर्शनास आणून देत आमदार गोरे म्हणाले, राज्य शासन कायम म्हणत असतं आम्हाला लस मिळत नाय. एकीकडे लस मिळत नसल्याचे ओरडायचे व दुसरीकडे लसीकरणात महाराष्ट्र देशात पहिल्या नंबरला आहे, असा दावा करायचा. जर लसच मिळत नाही तर महाराष्ट्र पहिल्या नंबरला कसा याचा आपण शोध घेत आहोत. 

फलटण तालुक्यातील माणसांना तालुक्यात व त्या त्या माणसांना आपल्या गावामध्ये लस घेता येईल, अशा पध्दतीची व्यवस्था व्हायला हवी. कोणताही कार्यक्रम दहा ते वीस माणसात घ्या, असं प्रशासन म्हणतं मग लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी हजार-हजार माणसं गर्दी करुन उभी रहात आहेत. ही परिस्थिती भयावह आहे व ती बदलण्यासाठी कुणीही विचार करताना दिसून येत नाही, अशी खंतही आमदार गोरे यांनी यावेळी व्यक्त केली. 

चंद्रकांतदादा तुम्हीच लक्ष घाला...
लसीकरणाच्या व्यवस्थापणाचा ठिकठिकाणी फज्जा उडत असल्याने लोकांना विशेष करुन जेष्ठ नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लसीकरण सुरळीतपणे पार पडण्यासाठी व हे नियोजण व्यवस्थित होण्यासाठी काय करता येईल याबाबत आपणच आपल्या स्तरावरुन प्रयत्न करावेत, अशी मागणी आमदार गोरे यांनी ऑनलाइन उपस्थित असलेले भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in