हॉटेल-मंगल कार्यालये टार्गेट; ५० च्यावर लोक आढळल्यास होणार कारवाई

कोणीही विनामास्क आढळ्यास त्यावर कडक कारवाई करण्यात येईल. पोलिसानी सायरन लावुन जनजागृती केली आहे. मात्र तरीही दुकाने, हॉटेल व अन्य व्यवसायात पाच पेक्षा अधिक लोक आढल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येऊन ते सील करण्यात येतील.
Hotel-Mars offices target; Action will be taken if more than 50 people are found
Hotel-Mars offices target; Action will be taken if more than 50 people are found

कऱ्हाड : सातारा जिल्ह्यात कोणीही विनामास्क आढळल्यास कडक कारवाई करण्याबरोबरच मेडीकल वगळता अन्य दुकाने, हॉटेल व व्यवसायाच्या ठिकाणी अचानक तपासणी करुन तेथे गर्दी आढल्यास ते सील करण्याचे आदेश पोलिस यंत्रणेला देण्यात आले आहेत. गृहखाते ॲक्शन मोडमध्ये असल्याची माहिती गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली. लग्न समारंभात ५० च्यावर लोक आढल्यास लग्नमालक आणि कार्यालयाच्या मालकावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.  

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणेकडुन करण्यात येणाऱ्या उपाय योजनांची माहिती देताना ते बोलत होते. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लोकांच्या दुर्लक्षामुळे संकट वाढणार नाही. याची दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत, असे सांगुन मंत्री देसाई म्हणाले, गेल्या आठ ते दहा दिवसात राज्यात तिप्पट चौपट रुग्णांची वाढ होत आहे, तरीही बहुतांशजण गांभीर्याने घेत नाहीत.

ग्रामीण भागात जरी रुग्ण कमी आढळत असले तरी सध्या कोठेही जिल्हाबंदी, नाकाबंदी केलेली नाही. त्यामुळे आवश्यक ती काळजी घेणे आवश्यक आहे. कोणीही विनामास्क आढळ्यास त्यावर कडक कारवाई करण्यात येईल. पोलिसानी सायरन लावुन जनजागृती केली आहे. मात्र तरीही दुकाने, हॉटेल व अन्य व्यवसायात पाच पेक्षा अधिक लोक आढल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येऊन ते सील करण्यात येतील.

राज्यात दोन हजारांपर्यत कोरोनारेट खाली आला होता. तो सात हजारांकडे गेला आहे. त्यामुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग २० पर्यंत करण्याच्या सुचना दिल्या आहेत. आजपासुन जिल्ह्यात अधिक कडक कारवाई करण्यात येणार आहे. लसीकरण झाल्यानंतर कोविड झाला अशी माहिती आमच्याकडे आलेली नाही. कोविडसाठी शासकीय आरोग्य विभाग आणि हॉस्पिटल सज्ज आहेत. भविष्यात आणखी कोविड सेंटर करावे लागले तरीही शासन ते करेल. अपवाद वगळता पोलिसांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com