नरेंद्र पाटलांची सन्मानपूर्वक पुनर्नियुक्ती करा; नियुक्त्या रद्द केल्याने माथाडी संघटनात नाराजी

महामंडळावरील संचालक मंडळाच्या नियुक्त्या अचानक रद्द केल्याने असंतोष वाढला आहे.नरेंद्र पाटील यांची सन्मानपूर्वक पुननियुक्ती करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य माथाडी युनियनचे पदाधिकारी,माथाडी कामगार व मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याचे युनियनकडून आज सांगण्यात आले.
  Honorable reappointment of Narendra Patil; Mathadi organization dissatisfied with cancellation of appointments
Honorable reappointment of Narendra Patil; Mathadi organization dissatisfied with cancellation of appointments

ढेबेवाडी : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची पुनर्रचना करुन महामंडळाच्या अध्यक्षपदी अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र व माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांची सन्मानपूर्वक पुननियुक्ती करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे पदाधिकारी, माथाडी कामगार व मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याची माहिती युनियनकडून आज देण्यात आली.

नरेंद्र पाटील अध्यक्ष असलेल्या अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या संचालक मंडळाच्या नियुक्त्या राज्य शासनाने रद्द केल्याने काल रात्रीपासून माथाडी संघटनेचे पदाधिकारी, माथाडी कामगार व मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

मराठा समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी 1998 मध्ये युती शासनाच्या काळात अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांच्या नावाने या महामंडळाची स्थापना करण्यात आली. 2016 मध्ये त्याच्या अध्यक्षपदी अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील यांची नियुक्ती झाल्यापासून महामंडळाच्या कामकाजाने मोठी गती घेतली होती. 

महामंडळावरील संचालक मंडळाच्या नियुक्त्या अचानक रद्द केल्याने असंतोष वाढला आहे.नरेंद्र पाटील यांची सन्मानपूर्वक पुननियुक्ती करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य माथाडी युनियनचे पदाधिकारी,माथाडी कामगार व मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याचे युनियनकडून आज सांगण्यात आले. 

महामंडळाच्या योजना सुरूच राहणार...

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्त्या रद्द केलेल्या असल्या तरी महामंडळाच्या योजना व लाभार्थ्यांना देण्यात येणारा व्याज परताव्याचा लाभ निरंतर सुरूच राहिल, अशी माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे. पदाधिकाऱ्यांनी जिल्हानिहाय दौरा करून महामंडळाच्या विविध योजनांतर्गत 19 हजारांवर लाभार्थ्यांना विविध बँकांमार्फत 1215 कोटींचे कर्ज वितरण केले आहे.

महामंडळामार्फत 61 कोटींची व्याज लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केल्याचे पत्रकात नमूद आहे. बँकांनी आतापर्यंत ज्याप्रमाणे सहकार्य केले तसेच यापुढेही करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. दरम्यान उद्या (बुधवार) दुपारी एक वाजता मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन नरेंद्र पाटील आपली भूमिका जाहीर करणार आहेत. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांची भूमिका ऑनलाईन पहाता येईल.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com