मंत्रालयातच बैठक लावतो, काळजी करू नका; शंभूराज देसाईंनी दिला मराठावाडी धरणग्रस्तांना धीर

प्रत्यक्ष जमिनीला पाणी मिळेपर्यंत निर्वाहभत्ता किंवा जमिनीऐवजी रोख रक्कम मिळण्याबाबतची मागणी प्रलंबित असल्याने अजून मूळ गाव सोडले नसल्याचे सांगून घरे पाण्यात बुडाल्याने निवारा शेडमध्ये राहात असल्याचे सांगितले.
मंत्रालयातच बैठक लावतो, काळजी करू नका; शंभूराज देसाईंनी दिला मराठावाडी धरणग्रस्तांना धीर
Holds meetings in the ministry, don't worry; Shambhuraj Desai gave patience to the victims of Marathawadi dam

ढेबेवाडी : जनतेच्या अडीअडचणी, समस्या व प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी २४ तास अलर्ट असलेला नेता अशी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांची स्वतंत्र ओळख आहे. मराठवाडीच्या धरणग्रस्तांनीही पुन्हा एकदा त्याबाबतचा अनुभव घेतला. ढेबेवाडीच्या अतिवृष्टीग्रस्त भागातील पाहणी दौऱ्यामधून मंत्री देसाई यांनी आवर्जून वेळ काढून मराठवाडी धरणग्रस्तांशी भर पावसात संवाद साधून ''तुमच्या प्रलंबित प्रश्नी लवकरच मंत्रालयात बैठक लावतोय, काळजी करू नका, बिनधास्त राहा,'' असा धीरही दिला. Holds meetings in the ministry, don't worry; Shambhuraj Desai gave patience to the victims of Marathawadi dam
 
मराठवाडी धरणग्रस्तांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मंत्री देसाई यांच्याकडूनही पाठपुरावा करण्यात येत आहे. पंचवीस वर्षांनंतर आता धरणाचे बांधकाम पूर्णत्वाकडे आलेले असतानाही पुनर्वसनाचे काही प्रश्न अजूनही शिल्लक असल्याने धरणग्रस्तांचा धीर खचत चालला आहे. मंत्री देसाई जिंती भागातील दरडीग्रस्त गावांच्या पाहणीबरोबरच तेथील स्थलांतरित कुटुंबांशी संवाद साधण्यासाठी आलेले असताना त्यांना भेटण्यासाठी रस्त्यावर पावसात थांबलेल्या धरणग्रस्तांना बघून त्यांनी गाडी थांबवली व त्यांच्याशी संवाद साधत समस्या ऐकून घेतल्या. 

उमरकांचन येथील खालचे आवाडातील धरणग्रस्तांनी सांगली जिल्ह्यात वाटप केलेल्या जमिनीला प्रत्यक्ष पाण्याचा लाभ मिळत नाही. कायद्याप्रमाणे चारपट जमीन, प्रत्यक्ष जमिनीला पाणी मिळेपर्यंत निर्वाहभत्ता किंवा जमिनीऐवजी रोख रक्कम मिळण्याबाबतची मागणी प्रलंबित असल्याने अजून मूळ गाव सोडले नसल्याचे सांगून घरे पाण्यात बुडाल्याने निवारा शेडमध्ये राहात असल्याचे सांगितले. 

उमरकांचन येथीलच चार धरणग्रस्तांचा जमीन वाटपाचा प्रश्न, सांगली जिल्ह्यातील जमीन वाटपाचे भिजत पडलेले घोंगडे आदी प्रश्नांबाबत या वेळी चर्चा झाली. त्यावर प्रलंबित प्रश्नी मंत्रालयात संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांसमवेत तातडीने बैठक घेऊन शिल्लक प्रश्नाची तड लावण्याची ग्वाही मंत्री देसाई यांनी दिली. या वेळी सरपंच आत्माराम सपकाळ, मनोज मोहिते, जगन्नाथ विभूते, शंकर मोहिते, छबुताई मोहिते, गणपतराव मोहिते, दत्तात्रय मोहिते आदी धरणग्रस्त उपस्थित होते. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in