वरिष्ठ पोलिस निरिक्षकाच्या दालनातच त्याने केला चाकू हल्ला...

श्री. पाटील यांनी शिखरे याचीही बाजू ऐकून घेतली. त्यानंतर त्यांनी मानेला समोर बोलवण्यास सांगितले. मानेला पोलिस घेवून श्री. पाटील यांच्या दालनात गेले. त्याचवेळी पोलिसांना हिसका देऊन मानेने स्वतःजवळील चाकूने थेट शिखरे याच्यावर सपासप वार करण्यास सुरवात केली. शिखरेच्या हात, मान व पाठीवर वार झाल्याने तो व्याकूळ होऊ खाली पडला.
He attacked the senior police inspector's room with a knife ...He attacked the senior police inspector's room with a knife ...
He attacked the senior police inspector's room with a knife ...He attacked the senior police inspector's room with a knife ...

कऱ्हाड : कराड शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक बी. आर. पाटील यांच्या दालनातच पूर्व वैमनस्यातून एकावर चाकू हल्ला झाला. हल्ला करणाऱ्याला पोलिस निरिक्षक पाटील यांनी त्वरीत पकडल्याने अनर्थ टळला. लखन भागवत माने (40 रा. हजारमाची) असे चाकू हल्ला करणाऱ्याचे नाव आहे. किशोर पांडूरंग शिखरे (27 हजारमाची) असे जखमी झाले आहेत.

अवघ्या काही सेकंदात झालेल्या घटनेत लखन माने यांने तीन वर्मी वार किशोर शिखरे यांच्या पाठीवर, पोटात व हातावर केले आहेत. त्यांच्यावर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस निरिक्षकांच्या दालनात झालेल्या चाकू हल्ल्याने पोलिस दलही हादरले आहे. 

याबाबत पोलिसांनी सांगितले की, लखन माने व किशोर शिखरे यांच्यात पूर्वी पासून वाद आहे. त्या वादाच्या कारणावरून शिखेरला घाबरून माने पंढरपूर येथे राहण्यास गेला होता. तेथे विठ्ठल मंदीरात येणाऱ्यांना गोपीचंद टिळा लावण्याचे काम करत होता. अलीकडे तो तेथेच स्थायिक होणार होता. तेथे असूनही किशोर शिखरे यांच्या वडीलांशी लखन माने नेहमी फोनवर बोलयाचा.

त्यांच्याशी संभाषण करू नकोस, असे मानेला नेहमीच सांगायचा. त्यावरून लखनशी त्याचा वादही झाला होता. त्याचा राग मनात धरून मानेने 25 फेब्रुवारीला दुपारी दोन वाजता मोबाईलवर शिखरेला धमकी दिली होता. तुझा गेम करणार आहे, असे तो शिखरेला म्हणाला होता. शिखरेने त्याची 26 फेब्रुवारीला पोलिसात तक्रार दिली होती. माने पंढरपूरला असल्याने पोलिसांनी त्याला आज चौकशीला बोलवले होते. 

सकाळी अकराच्या सुमारास माने कराड शहर पोलिस ठाण्यात आला. पहिल्यांदा त्याला पोलिस निरिक्षक पाटील यांच्या दालनात नेण्यात आले. श्री. पाटील यांनीही दाखल एनसीच्या अनुशंगाने माने याच्याकडे चौकशी केली. त्याचे म्हणणे ऐकल्यानंतर शिखरे यांना बोलवण्यास तपासी अंमलदारांना सांगितले. त्यानुसार शिखरेही अर्धा तासात तेथे आला. त्यालाही पोलिस निरिक्षक पाटील यांना भेटवले.

श्री. पाटील यांनी शिखरे याचीही बाजू ऐकून घेतली. त्यानंतर त्यांनी मानेला समोर बोलवण्यास सांगितले. मानेला पोलिस घेवून श्री. पाटील यांच्या दालनात गेले. त्याचवेळी पोलिसांना हिसका देऊन मानेने स्वतःजवळील चाकूने थेट शिखरे याच्यावर सपासप वार करण्यास सुरवात केली. शिखरेच्या हात, मान व पाठीवर वार झाल्याने तो व्याकूळ होऊ खाली पडला.

अवघ्या काही सेकंदात घडलेल्या या प्रकाराने पोलिस निरिक्षक पाटील हबकले. मात्र क्षणाचाही विलंब न करता त्यांनी खुर्चीतून उठून मानेच्या दिशेने धाव घेत त्याच्या मुसक्या आवळल्या. दालनात झालेली घाईगडबड कानावर ऐकून पोलिस ठाण्यातील अन्य कर्मचारीही तेथे धावले. पोलिसांनी मानेला अटक केली आहे. त्याबाबत शिखरे यांची फिर्याद घेण्याचे काम सुरू आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com