महाविकास आघाडीकडून राज्यपालांचा तिरस्कारच.... 

था्ळ्या वाजविल्या, दिवे का लावले, असे उपरोधिक मुद्दे भाई जगताप यांन अत्यंत चांगल्या पध्दतीने मांडले. पण दुसऱ्याकडे बोट दाखविताना आपण काय केले हे सांगितले असते तरी बरे झाले असते, असा टोलाही श्री. दरेकरांनी लगावला.
Hate of Governor from Mahavikas Aghadi says BJP leader Pravin Darekar
Hate of Governor from Mahavikas Aghadi says BJP leader Pravin Darekar

सातारा : महाविकास आघाडीच्या सरकारने आजपर्यंत राज्यपालांवर टीका करण्याचे काम केले आहे. आज विधान परिषदेत राज्यपालांचे अभिभाषण झाले. त्यांचे काही आमदार व मंत्र्यांनी अभिनंदन केले. पण त्यांनी अस्खलित मराठी भाषेत अभिभाषण केल्याबद्दल त्यांना पुरस्कारीत करायला हवे होते. परंतू पुरस्कारीत करण्याऐवजी तिरस्कार करण्याचे काम या महाविकास आघाडी सरकारने केले आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.  

विधान परिषदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेवर श्री. दरेकर बोलत होते. राज्यपालांच्या अभिभाषणाचे अभिनंदन केल्याबद्दल भाई जगताप यांचे अभिनंदन करून श्री. दरेकर म्हणाले, राज्यपालांवर महाविकास आघाडी सरकारने पहिल्यापासूनच टीका करण्याचेचे काम केले आहे.

आज राज्यपालांना अस्खलित मराठी भाषेण अभिभाषण केल्याबद्दल त्यांना पुरस्कारीत करायला हवे होते. मात्र, पुरस्कारीत करण्यापेक्षा तिरस्कार करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले आहे. था्ळ्या  वाजविल्या, दिवे का लावले, असे उपरोधिक मुद्दे भाई जगताप यांन अत्यंत चांगल्या पध्दतीने मांडले. पण दुसऱ्याकडे बोट दाखविताना आपण काय केले हे सांगितले असते तरी बरे झाले असते, असा टोलाही श्री. दरेकरांनी लगावला.

कोरोना काळात महाराष्ट्रातील जनतेसाठी सरकारने काय दिवे लावले याचा उहापोह केला असता तर संतुलित भाषण झाले असते. महाराष्ट्रात ५२ हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला याचे राज्य सरकारला काहीही सोयर सुतक नाही. केवळ केंद्र व राज्यात तुलना करण्याचेच काम होत आहे. मुळात तुलनात कोणात होते. शहरा शहरात, राज्या राज्यात होते. राज्याची व केंद्राची तुलना कधीच होऊ शकत नाही.

राज्य सरकारचा 'धारावी पॅटर्न' देशात गाजला त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने याची दखल घेतली. त्यासोबतच मोदींनी संपूर्ण जगाला दिशा देण्याचे काम केले. संपूर्ण जगाला लस पुरविण्याचे काम आपला देश करतो, संकटाच्या काळात आत्मनिर्भर भारत करण्याचे काम मोदी साहेब ते करत आहेत. त्याचा उल्लेख केला असतात तर बरे झाले असते. पण मोदींची दाढी किती वाढलीय, माजी मुख्यमंत्री गेलमटोल असे बोलले जात आहे. हे सभागृहाच्या प्रतिष्ठेला अणि परंपरेला शोभणारे नाहीत, असेही त्यांनी खडसावले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com