कोरोनामुक्त गावांसाठी हसन मुश्रीफ यांची मोठी घोषणा - Hassan Mushrif's big announcement for corona free villages | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोनामुक्त गावांसाठी हसन मुश्रीफ यांची मोठी घोषणा

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 2 जून 2021

 कोरोनामुक्त गाव स्पर्धेत प्रत्येक महसूल विभागात चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख रुपये, २५ लाख रुपये व १५ लाख रुपये याप्रमाणे बक्षीस दिले जाणार आहेत.  सहा महसुली विभागात प्रत्येकी तीन प्रमाणे राज्यात एकुण १८ बक्षीसे दिली जाणार आहेत. यासाठी बक्षीसाची एकुण रक्कम पाच कोटी ४० लाख रुपये असेल.

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे व गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त होऊन त्याद्वारे तालुका, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावे, यासाठी राज्यात कोरोनामुक्त गाव (Corona fress Villege) स्पर्धा घेण्यात येत असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Minister Hasan Mushrif ) यांनी केली आहे. Hassan Mushrif's big announcement for corona free villages

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच जनतेशी संवाद साधताना गावच्या वेशीवरच कोरोनाला रोखलेल्या गावांचा गौरव केला होता. या उपक्रमास आता अधिक चालना देण्यासाठी स्पर्धेचे आयोजन केले आहेण

कोरोनामुक्त गावांना बक्षीसे

 कोरोनामुक्त गाव स्पर्धेत प्रत्येक महसूल विभागात चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख रुपये, २५ लाख रुपये व १५ लाख रुपये याप्रमाणे बक्षीस दिले जाणार आहेत.  सहा महसुली विभागात प्रत्येकी तीन प्रमाणे राज्यात एकुण १८ बक्षीसे दिली जाणार आहेत. यासाठी बक्षीसाची एकुण रक्कम पाच कोटी ४० लाख रुपये असेल.

कोरोनामुक्त गावांना मिळणार विकासकामे

 याशिवाय कोरोनामुक्त गाव स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या तीन ग्रामपंचायतींना लेखाशिर्ष पंचवीस/पंधरा व तीस-चोपन्न या योजनांमध्ये प्राधान्य देऊन यामधून प्रत्येक महसूल विभागात पहिल्या तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख रुपये, २५ लाख रुपये व १५ लाख रुपये इतक्या निधीची विकासकामे मंजुर केली जाणार आहे. स्पर्धेत सहभागी गावांचे विविध २२ निकषांवर गुणांकन करण्यात येणार आहे. यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय आज जारी करण्यात येत आहे. या स्पर्धेत राज्यातील सर्व गावांनी सहभागी होऊन आपले गाव लवकरात लवकर कोरोनामुक्त करावे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख