मराठा आरक्षण प्रश्नावर हर्षवर्धन पाटलांची पृथ्वीराज चव्हाणांशी चर्चा - Harshvardhan Patil's discussion with Prithviraj Chavan on Maratha reservation issue | Politics Marathi News - Sarkarnama

मराठा आरक्षण प्रश्नावर हर्षवर्धन पाटलांची पृथ्वीराज चव्हाणांशी चर्चा

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 2 जून 2021

राज्य सरकार केंद्र सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूने असताना सुध्दा सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाचे आरक्षण का टिकले नाही. राज्य सरकार कुठे कमी पडले, प्रस्ताविक करताना काही त्रुटी राहिल्या आहेत का, या सगळ्या गोष्टी गांभीर्याने बघितल्या पाहिजेत. त्यासाठी मी इतर सर्व राजकिय पक्षांशी चर्चा करत आहे. भारतीय जनता पक्षही यापुढे मराठा समाजाच्या सर्व आंदोलनात सहभागी होणार आहे.

कऱ्हाड : मराठा समाजाचे रद्द झालेले आरक्षण पुन्हा मिळाले पाहिजे. यासाठी सर्व पक्षियांनी एकमताने चर्चा करून हे आरक्षण (Maratha Reservation) पुन्हा मिळवून देण्यासाठी कायदेशीर बाबी घटनात्मक बाबी काय आहेत, हे समजावून घेऊन त्यानुसार प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी भाजपचे जिल्हा प्रभारी हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी कराडात जाऊन चर्चा केली. Harshvardhan Patil's discussion with Prithviraj Chavan on Maratha reservation issue

मराठा आरक्षण प्रश्नासाठी भाजपने प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रभारी म्हणून एक नेत्याची निवड केली आहे. सातारा जिल्ह्याची जबाबदारी हर्षवर्धन पाटील यांच्यावर असून गेली दोन दिवस ते जिल्ह्यतील नेत्यांची भेट घेऊन मराठा आरक्षण प्रश्नी मागील वाद विसरून सर्वांनी एकत्र येण्याचे आव्हान करत आहेत. काल त्यांनी खासदार उदयनराजे भोसले, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली. आज त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा केली. तासाभराच्या चर्चेनंतर हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

हेही वाचा : सुप्रिया सुळे यांनी राज्य व केंद्र सरकारला केली ही विनंती

ते म्हणाले, राज्य सरकार केंद्र सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूने असताना सुध्दा सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाचे आरक्षण का टिकले नाही. राज्य सरकार कुठे कमी पडले, प्रस्ताविक करताना काही त्रुटी राहिल्या आहेत का, या सगळ्या गोष्टी गांभीर्याने बघितल्या पाहिजेत. त्यासाठी मी इतर सर्व राजकिय पक्षांशी चर्चा करत आहे. भारतीय जनता पक्षही यापुढे मराठा समाजाच्या सर्व आंदोलनात सहभागी होणार आहे.

आवश्य वाचा :  ठाकरे बंधू एकत्र येतील का ? राज ठाकरेंनी आकाशाकडे बोट दाखवित उत्तर दिले..म्हणाले..

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख