कोयना नदीपात्रात माशाच्या गळाला लागले हॅंडग्रेनेड

पुलावरून कोयना नदीत साकुर्डीचे संभाजी चव्हाण, योगेश जाधव व अरूण मदने मासेमारी करीत होते. त्यावेळी त्यांनी टाकलेल्या गळ्यामध्ये पिशवी अडकली. त्यावेळी त्यांनी सदरची पिशवी उघडून पाहिली असता त्यामध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आली.
कोयना नदीपात्रात माशाच्या गळाला लागले हॅंडग्रेनेड
A hand grenade hit the neck of a fish in the Koyna river basin

तांबवे : कोयना नदीतून (Koyana River) वाहत आलेल्या एका प्लॉस्टिकच्या पिशवीत तीन हॅंडग्रेनेड (Hand grenade) सापडले आहेत. साकुर्डी येथील मासेमारी करणाऱ्या तीन युवकांना हे बॉम्ब सापडले आहेत. आज सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. मासेमारी करणाऱ्या युवकांच्या (Youth) गळाला बॉम्ब असलेली पिशवी अडकली होती. त्यांनी ती उघडून पाहिले असता त्यामध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने त्यांनी कराड पोलिसांत (Karad Police) याबाबतची माहिती दिली. 

घटनेची माहिती मिळताच दहशतवाद विरोधी पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. तांबवेच्या कोयना नदीवर पूल आहे. पुलावरून कोयना नदीत साकुर्डीचे संभाजी चव्हाण, योगेश जाधव व अरूण मदने मासेमारी करीत होते. त्यावेळी त्यांनी टाकलेल्या गळ्यामध्ये पिशवी अडकली. त्यावेळी त्यांनी सदरची पिशवी उघडून पाहिली असता त्यामध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आली. युवकांनी तातडीने याबाबतची माहिती कराड पोलिसांना दिली. 

पोलिस तातडीने त्या ठिकाणी दाखल झाले. पोलिसांनी प्राथमिक पाहणी केली असता ते आर्मीमध्ये वापरले जाणारे हॅंडग्रेनेड बॉम्ब असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ही माहिती दहशतवादविरोधी पथकाला देण्यात आली. दुपारी तीनच्या सुमारास दहशतवाद विरोधी पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाकडून हॅंडग्रेनेडची तपासणी सुरू असून ते नदीपात्रात कोणी टाकले याचा शोध घेतला जात आहे. पोलिस उपअधिक्षक रणजीत पाटील, पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे, डीबीचे शशिकांत काळे, अमित पवार यांच्यासह बॉम्ब शोध व नाशक पथकाचे कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in