गुरुवर्य स्वामी आनंदयोगी महाराज यांचे निधन : नारायण पाटलांना अश्रू अनावर

गुरुवर्य स्वामी आनंदयोगी महाराज यांचा लव्हे येथे माँ शारदा नावाचा आश्रम होता. येथे विविध धार्मिक कार्यक्रम होत होते.
गुरुवर्य स्वामी आनंदयोगी महाराज यांचे निधन : नारायण पाटलांना अश्रू अनावर
Guruvarya Swami Anandyogi Maharaj passed away

करमाळा : लव्हे (ता. करमाळा) येथील गुरुवर्य स्वामी आनंदयोगी महाराज (वय 70) यांचे सोमवारी (ता. 23) सकाळी 11 वाजताच्या सुमारास निधन झाले आहे.  सकाळी त्यांची तब्येत बरी नसल्याचे समजताच शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील हे स्वत त्यांना घेऊन करमाळा येथे उपचारासाठी आले होते. मात्र, त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाच त्यांचे देहावसन झाले. यावेळी त्यांच्यासमवेत असलेले माजी आमदार नारायण पाटील यांना गहिवरून आले. Guruvarya Swami Anandyogi Maharaj passed away

लवळे येथे स्वामी आनंद योगी महाराज यांच्यासाठी माँ शारदा आश्रम नावाचा आश्रम उभारण्यात आला होता. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. माजी आमदार नारायण पाटील यांचे ते गुरु होते. त्यांच्या दर्शनासाठी वेगवेळ्या ठिकाणावरुन सामाजिक, राजकीय, शासकीय, शैक्षणिक क्षेत्रातील अनेकजण येत असत. आनंद नेवगी महाराजांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात होती.

गुरुवर्य स्वामी आनंदयोगी महाराज हे गेली काही महिन्यांपासून आजारी होते. सोमवारी नारायण पाटील यांना माहिती समजताच त्यांनी उपचार करण्यासाठी माजी आमदार नारायण पाटील हे त्यांना स्वतःच्या गाडीत करमाळा येथे रुग्णालयात घेऊन आले होते. दरम्यान त्यांचे निधन झाले. हे समजताच पाटील गहिवरले. 

गुरुवर्य स्वामी आनंदयोगी महाराज यांचा लव्हे येथे माँ शारदा नावाचा आश्रम होता. येथे विविध धार्मिक कार्यक्रम होत होते. शारदा आश्रम लव्हे येथे शारदीय नवराञोउत्सोवानिमित्त झालेल्या अनेक कार्यक्रमात माजी आमदार नारायण पाटील हजर असत. स्वामी आनंदयोगी महाराज यांच्या एका वाढदिवसानिमित्त साखरतुला करण्यात आली होती. दुपारी बाराच्या सुमारास त्यांचा मृतदेह दर्शनासाठी माँ शारदाश्रम लव्हे येथे ठेवण्यात आला आहे .

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in