"गुरूवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर' योजना अंतिम टप्प्यात; रेल्वे क्रॉसिंगचे काम 15 दिवसांत होणार  - "Guruvarya Laxmanrao Inamdar Jihe-Kathapur" scheme in final stage; railway crossing to be completed in 15 days | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

"गुरूवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर' योजना अंतिम टप्प्यात; रेल्वे क्रॉसिंगचे काम 15 दिवसांत होणार 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 3 जून 2021

हा प्रकल्प रेल्वे क्रॉसिंगच्या अडचणीमुळे रखडला होता. लोहमार्गाखालून येणारी पाइपलाइन अधांतरीच होती. त्यासाठी आवश्‍यक असलेले सर्व काम दोन्ही बाजूंनी पूर्ण केले गेले होते. परंतु, रेल्वे मंत्रालयाची परवानगी नसल्याने या कामासाठी पुणे-मिरज लोहमार्ग वाहतूक बंद करून क्रॉसिंग करता येत नव्हते. त्यासाठी विशेष परवानगीची गरज होती.

विसापूर (ता. खटाव) : खटाव-माणसारख्या (Khatav-Maan) दुष्काळी भागासाठी अतिमहत्त्वाच्या जिहे-कठापूर उपसा जलसिंचन प्रकल्पाचे (Jihe Kathapur Yojana) काम अंतिम टप्प्यात आले आहे. सद्य:स्थितीत रेल्वे क्रॉसिंगच्या अडचणीमुळे या प्रकल्पाचे काम रखडले होते. या कामाला रेल्वे मंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळाल्याने प्रकल्पाचे काम लवकरच पूर्ण होणार असून दुष्काळी जनतेचे कित्येक वर्षांचे स्वप्न साकार होणार आहे, अशी माहिती लक्ष्मणराव इनामदार लोककल्याण चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. "Guruvarya Laxmanrao Inamdar Jihe-Kathapur" scheme in final stage; railway crossing to be completed in 15 days

याबाबत पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाची सुधारित प्रशासकीय मान्यता, केंद्रीय जलआयोगाची परवानगी, तसेच "अनुशेषा'मधून हा प्रकल्प बाहेर काढणे, प्रकल्प प्राधान्य क्रमामध्ये ठेवणे ही सर्व कामे केंद्र सरकारच्या सहकार्यामुळे झाली. त्यासाठी आवश्‍यक असलेल्या निधीची भरीव तरतूद केंद्र व तत्कालीन युती सरकारने वारंवार केली. तत्कालीन जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून या योजनेला नाबार्डचे अर्थसाह्य मिळाले.

हेही वाचा : गुड न्यूज : आणखी एक मेड इन इंडिया लस आली; सरकारला 30 कोटी डोस मिळणार

हा प्रकल्प रेल्वे क्रॉसिंगच्या अडचणीमुळे रखडला होता. लोहमार्गाखालून येणारी पाइपलाइन अधांतरीच होती. त्यासाठी आवश्‍यक असलेले सर्व काम दोन्ही बाजूंनी पूर्ण केले गेले होते. परंतु, रेल्वे मंत्रालयाची परवानगी नसल्याने या कामासाठी पुणे-मिरज लोहमार्ग वाहतूक बंद करून क्रॉसिंग करता येत नव्हते. त्यासाठी विशेष परवानगीची गरज होती. ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या मंत्रालयाबरोबर केलेल्या पाठपुराव्यामुळे या कामाला मंजुरी मिळाली. क्रॉसिंगचे काम पूर्ण करण्यासाठी दिनांक 1 जून ते 15 जून 21 पर्यंत गरजेप्रमाणे लोहमार्ग बंद करून काम पूर्ण करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. 

बंधारा, पंपहाउस, पाइपलाइनचे काम पूर्ण 
जिहे-कठापूर येथील बॅरेज बंधाऱ्याचे काम 100 टक्के पूर्ण असून या योजनेच्या पंपहाउसचे कामसुद्धा पूर्णत्वास गेले आहे. जिहे-कठापूर ते नेर धरण संपूर्ण 23 किलोमीटरची पाइपलाइन वर्धनगड घाट बोगद्यासह शंभर टक्के पूर्ण झाली आहे. या योजनेस आवश्‍यक असणारा 40 केव्हीए विद्युतपुरवठा प्राधान्याने मंजूर करण्यात येऊन तो अंतिम टप्प्यात आहे. पाइपलाइन चाचणी पूर्ण झाली आहे, त्यामुळे लवकरच कृष्णेचे पाणी येरळेला मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरू लक्ष्मणराव इनामदार यांच्या नावामुळे योजनेच्या रखडलेल्या कामांना खऱ्या अर्थाने गती मिळाली. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख