मातोश्रीच्या कृपेने राष्ट्रवादीचा सदस्य झाला जिल्हा परिषद अध्यक्ष - By the grace of Matoshri, he became a the President of Zilla Parishad | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

मातोश्रीच्या कृपेने राष्ट्रवादीचा सदस्य झाला जिल्हा परिषद अध्यक्ष

मुझफ्फर खान 
सोमवार, 22 मार्च 2021

मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असलेले शिवसेना आमदार भास्कर जाधव यांची नाराजी दूर करण्यासाठी मातोश्री’ने आमदार भास्कर जाधव यांच्या चिरंजीवांना रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी देण्याचा निर्णय घेतला.

चिपळूण : आमदार भास्कर जाधव यांचे सुपूत्र विक्रांत जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य आहेत. तरीही मातोश्रीची त्यांच्यावर कृपा झाली आणि त्यांना रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देण्यात आले. मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असलेल्या जाधवांची पक्षाने नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे काका बाळ जाधव यांना मागे टाकत विक्रांत पुन्हा एकदा सरस ठरल्याची चर्चा आहे.

 रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आमदार भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव (गुहागर), भाऊ बाळ जाधव (चिपळूण), उदय बने (रत्नागिरी) आणि अरूण कदम (खेड) इच्छूक होते. आमदार जाधव शिवसेनेत असले तरी मुलगा विक्रांत याने राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला नव्हता. त्यामुळे शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीला कसे द्यायचे हा तांत्रिक मुद्दा होता.

मात्र मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असलेले शिवसेना आमदार भास्कर जाधव यांची नाराजी दूर करण्यासाठी मातोश्री’ने आमदार भास्कर जाधव यांच्या चिरंजीवांना रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी देण्याचा निर्णय घेतला. भास्कर जाधव यांचे बंधू बाळ जाधव अध्यक्षपदासाठी शर्यतीत होते. बाळ जाधव यांना अध्यक्ष करून भास्कर जाधवांच्या नाराजीत आणखी भर टाकण्यासाठी पक्षातील काही नेत्यांनी फिल्डिंग लावली होती. परंतु काका आणि पुतण्यामधील शर्यतीत पुतण्याने बाजी मारली.
.
रत्नागिरी जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल : 

शिवसेना 39, 
राष्ट्रवादी : 16.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख