अतिवृष्टीग्रस्त मुंबईकरांच्या तोंडाला सरकारने पाने पुसली : भातखळकर यांची टीका - Government wipes leaves from the mouths of Mumbaikars affected by heavy rains: Bhatkhalkar's criticism | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

अतिवृष्टीग्रस्त मुंबईकरांच्या तोंडाला सरकारने पाने पुसली : भातखळकर यांची टीका

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 5 ऑगस्ट 2021

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांमध्येही हानी झाली. चेंबूर, मुलुंड येथे दरडी कोसळल्या, हनुमाननगर, पोयसर, दिंडोशी, गोवंडी, निबारपाडा, विक्रोळी या परिसरात हजारो घरांमध्ये पाणी शिरले. 

मुंबई : राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या 11 हजार 500 कोटी रुपयांच्या मदत पॅकेजमध्ये मुंबईकरांना कसलीही मदत न
केल्याबद्दल भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारचा निषेध केला आहे. सरकारच्या मदत पॅकेजमध्ये मुंबईचा उल्लेख नसून सरकारने पुन्हा यंदाही मुंबईकरांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे. Government wipes leaves from the mouths of Mumbaikars affected by heavy rains: Bhatkhalkar's criticism

16 ते 18 जुलै दरम्यान अतिवृष्टीमुळे मुंबईकरांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. सखल भागात पाणी साठल्याने चाळकरी, झोपडीवासीय रहिवासी-दुकानदार आदींचे सामानसुमान नष्ट झाले, अनेक ठिकाणी दरडी-भिंती कोसळून 40 लोक मरण पावले तसेच घरांचे नुकसान आणि वित्तहानी देखील झाली.

हेही वाचा : सांगोल्यात शेकाप पक्ष एकसंघ ठेवण्यासाठी नेतृत्वाचा लागणार कस

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांमध्येही हानी झाली. चेंबूर, मुलुंड येथे दरडी कोसळल्या, हनुमाननगर, पोयसर, दिंडोशी, गोवंडी,
निबारपाडा, विक्रोळी या परिसरात हजारो घरांमध्ये पाणी शिरले. मात्र, तात्काळ नजर पंचनामे करून मुंबईकरांना मदत करणेही सरकारला जमले नाही, अशी खरमरीत टीका भातखळकर यांनी केली आहे. 

आवश्य वाचा : ४१ वर्षांनी भारतीय हॉकी टीमने घडवला इतिहास

महाराष्ट्रातील आपत्तीग्रस्तांना मदत करतानाच मुंबईतील बाधितांना मदत करणे सरकारला काहीच कठीण नव्हते. मुंबईकरांना मदत न करणे हे संतापजनक असून याबद्दल भाजपतर्फे राज्य सरकारचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. सरकारने अजूनही मुंबईकरांना नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा याप्रश्नी भाजपतर्फे तीव्र आंदोलन केले जाईल, असेही भातखळकर यांनी म्हटले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख