अधिवेशनापासून सरकारचा पळ; गर्दीच्या कार्यक्रमांना कोरोना नसतो का : प्रविण दरेकर यांची टीका

ठाकरे सरकारने पावसाळी अधिवेशन फक्त दोन दिवसांचे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा दरेकर यांनी तीव्र निषेध केला आहे.
The government fled the convention; Why there is no corona in crowded events: Criticism of Praveen Darekar
The government fled the convention; Why there is no corona in crowded events: Criticism of Praveen Darekar

मुंबई : कोरोना आटोक्यात येत असूनही सरकार कोरोनाचे कारण पुढे करत दोन दिवसांचेच पावसाळी अधिवेशन घेत आहे, हा चक्क पळपुटेपणा आहे. कोरोनाचे कारण देताना एरवी गर्दी असलेल्या राजकीय कार्यक्रमात कोरोनाची आठवण राज्यकर्त्यांना येत नाही का, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज येथे केली. The government fled the convention; Why there is no corona in crowded events: Criticism of Praveen Darekar

मुख्य म्हणजे राज्यासमोर आज मराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षणासारखे महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत. मात्र या महत्वाच्या विषयांवर सरकार किती गंभीर आहे, हेच अल्पकालीन अधिवेशनावरून दिसते आहे, अशी टीकाही दरेकर यांनी केली. अधिवेशन दोनच दिवस घेण्यासाठी सरकार कोरोनाचे कारण पुढे करीत आहे. मात्र नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात कार्यकर्त्यांच्या प्रचंड गर्दीत पक्षकार्यालयाचे उद्घाटन केले होते. त्याचा अप्रत्यक्ष उल्लेख करीत दरेकर यांनी राज्यकर्त्यांना टोला लगावला.  

ठाकरे सरकारने पावसाळी अधिवेशन फक्त दोन दिवसांचे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा दरेकर यांनी तीव्र निषेध केला आहे. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, शाळा बंद आहेत, रोजगाराची गाडी रूळावर आलेली नाही, आशा वर्कस, परिचारिका यांच्या मागण्या प्रलंबित आहेत. अधिवेशनाच्या कार्यक्रम पत्रिकेत दाखवण्यात आलेले कार्यक्रम घेणे आवश्यक होते, पण ते देखील सरकारने केले नाही. यातुन सरकारचा नाकर्तेपणा जनतेसमोर आला असल्याची टीका दरेकर यांनी केली.

दोन दिवसांचे अधिवेशन प्रस्तावित असून त्यातील पहिला दिवस शोकप्रस्तावात जाणार आहे. महाराष्ट्रातील अनेक गंभीर प्रश्न प्रलंबित असताना त्यावर एका दिवसात काय चर्चा होणार हे राज्यकर्त्यांना कळायला हवे. जेव्हा जेव्हा अधिवेशन जवळ येते, तेव्हा कोरोना वाढल्याचे कारण पुढे करत अधिवेशनच न घेण्याचा सरकारचा प्रयत्न असतो. एकीकडे अधिवेशन पुढे ढकलायचे आणि दुसरीकडे गर्दीतील राजकीय कार्यक्रमात सहभाग घ्यायचा असे राज्यकर्त्यांचे धोरण आहे. तेव्हा राज्यकर्त्यांना कोरोना असल्याचे आठवत नाही का ? फक्त आपले अपयश झाकण्यासाठी केवळ दोन दिवसांचे अधिवेशन घेण्याचा सरकारचा डाव आहे, अशीही टीका दरेकर यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com