गोपीचंद पडळकरांचा पोरकटपणा; टीका करताना त्यांनी पात्रता तपासावी : जयंत पाटील

सातारा नगरपालिका निवडणूकीचा निर्णय स्थानिक पदाधिकारी घेतील. मेरीटने आहे ते केले पाहिजे. पक्षाचे सातारा येथील युनिट आहे ते आम्हाला निर्णय घेऊन कळवतील. ते काय कळवतील त्याला अनुमती द्यायची की नाही हा भाग पुढचा आहे. अजून त्यांनी माझ्याकडे संपर्क केलेला नाही.
Gopichand Padalkar's childishness; He should check his eligibility while criticizing says Jayant Patil
Gopichand Padalkar's childishness; He should check his eligibility while criticizing says Jayant Patil

सातारा : मोठ्या व्यक्तींवर टीका करुन सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी अक्रस्थाळीपणाची विधाने गोपीचंद पडळकर करत आहेत. कोणाबद्दलही बोलताना आपली तेवढी पात्रता आहे का हे आधी त्यांनी ठरवावे. स्थानिक लोकांनी निर्णय घेऊन कार्यक्रमाचे नियोजन केले होते. तेथे जाऊन तो थांबवणे हा पोरखटपणा आहे. राजकारणात किती खालच्या थराला जायचे याचा हा एक नमूना आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना फटकारले.

दरम्यान सातारा पालिकेच्या निवडणूकीचा निर्णय स्थानिक पदाधिकारी घेतील, असे सांगून त्यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांच्या कोर्टात या निवडणूकीचा चेंडू टाकला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील हे काल (शनिवारी) रात्री उशीरा सातारा शासकिय विश्रामगृहात आले होते. यावेळी आमदार मकरंद पाटील व जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी सारंग पाटील, सत्यजित पाटणकर, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, अविनाश मोहिते, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, अतुल शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर त्यांनी राष्ट्रवादीच्या निवडक पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. 

सातारा पालिकेच्या निवडणूकीबाबत काय निर्णय झाला आहे का, याविषयी विचारले असता श्री. पाटील म्हणाले, सातारा नगरपालिका निवडणूकीचा निर्णय स्थानिक पदाधिकारी घेतील. मेरीटने आहे ते केले पाहिजे. पक्षाचे सातारा येथील युनिट आहे ते आम्हाला निर्णय घेऊन कळवतील. ते काय कळवतील त्याला अनुमती द्यायची की नाही हा भाग पुढचा आहे. अजून त्यांनी माझ्याकडे संपर्क केलेला नाही. 

दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर भाष्य करताना ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्यांची चूक हळू हळू लक्षात येऊ लागली आहे. पंतप्रधानांनी हट्ट करणे बरोबर नाही. चार पाऊले मागे येऊन शेतकऱ्यांशी विश्‍वासाने चर्चा केली असती तर हे आंदोलन थांबवले असते. आमदार गोपीचंद पडकर यांनी श्री. पवारांवर केलेल्या टीकेविषयी विचारले असता ते म्हणाले, मोठ्या व्यक्तींवर टीका करुन सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी ते अक्रस्थाळीपणाची विधाने करत आहेत.

कोणाबद्दलही बोलताना तेवढी आपली पात्रता आहे का, हे आधी ठरवायला हवे. स्थानिक लोकांनी निर्णय घेऊन कार्यक्रमाचे नियोजन केले होते. ते तेथे जावून तो कार्यक्रम थांबवणे हा त्यांचा पोरखटपणा आहे. राजकारणात किती खालच्या थराला जातात, याचा हा एक नमूना आहे, अशी टीकाही श्री. पाटील यांनी केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com