Good news for farmers: Rayat Bazaar launches in Satara under 'Vikel Te Pikel' campaignGood news for farmers: Rayat Bazaar launches in Satara under 'Vikel Te Pikel' campaign
Good news for farmers: Rayat Bazaar launches in Satara under 'Vikel Te Pikel' campaignGood news for farmers: Rayat Bazaar launches in Satara under 'Vikel Te Pikel' campaign

शेतकऱ्यांसाठी खुशखबर : 'विकेल ते पिकेल' अभियानातंर्गत रयत बाजाराचा साताऱ्यात प्रारंभ

'विकेल ते पिकेल' अभियानाच्या अंमलबजावणीसाठी कृषी व संलग्न विभागांच्या तसेच सहकार, पणन, नाबार्ड इत्यादी विभागांच्या विविधयोजनांची सांगड घालण्यात येणार असून विविध योजनांतर्गत शेतकरी गटांना त्यांच्या शेतमाल थेट ग्राहकांना विक्री करण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

सातारा : 'विकेल ते पिकेल' हे अभियान राज्यात राबविण्यात येणार असून या अभियानातंर्गत बाजारात शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव, बाजारपेठ, ग्राहकांना ताजी फळे व भाजीपाला वाजवी दरात उपलब्ध होणार आहेत. याचा लाभ शेतकऱ्यांबरोबर ग्राहकांना होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. 

'विकेल ते पिकेल' या धोरणांतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानाचा प्रारंभ आज पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते अण्णासाहेब कल्याणी शाळेसमोरील मैदानात करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, जिल्हा नियोजन अधिकारी बी. जे. जगदाळे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर, कृषी उपसंचालक विजयकुमार राऊत, आत्माचे प्रकल्प संचालक अशोक देसाई यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी, शेतकरी उपस्थित होते. 

'विकेल ते पिकेल' अभियानाच्या अंमलबजावणीसाठी कृषी व संलग्न विभागांच्या तसेच सहकार, पणन, नाबार्ड इत्यादी विभागांच्या विविध
योजनांची सांगड घालण्यात येणार असून विविध योजनांतर्गत शेतकरी गटांना त्यांच्या शेतमाल थेट ग्राहकांना विक्री करण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांनी आपला माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवून दिलासादायक काम केले. आज नवीन पिढी शेती करत असून विविध प्रयोग करीत आहेत. शेतकऱ्यांची पिकावलेला मालाला चांगला भाव व बाजार पेठ मिळावी यासाठी 'विकेल ते पिकेल' या धोरणांतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानाच्या माध्यमातून आर्थिक उन्नती होईल,
असा विश्वासही पालकमंत्री पाटील यांनी व्यक्त केला.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com