7.5 कोटीची सोनेचोरी : साताऱ्यातील डाॅ. निलेश साबळे आणि राहुल घाडगे यांच्या शोधात पोलिस...

गेले वीस दिवस केरळ पोलिस साताऱ्यात तळ ठोकून होते. ही टीम रविवारी रात्री उशीरा केरळकडे रवाना झाली. सोमवारी ती केरळमध्ये दाखल झाली असून त्यांनी आपला अहवाल सादर करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू ठेवली होती आहे.
7.5 कोटीची सोनेचोरी : साताऱ्यातील डाॅ. निलेश साबळे आणि राहुल घाडगे यांच्या शोधात पोलिस...
Gold Robery of Rs 7.5 crore: Police in search of Dr. Nilesh Sable and Rahul Ghadge ...

सातारा : केरळ येथील 'मारूथा रोड सहकारी ग्रामीण क्रेडिट सोसायटी' दरोड्यातील २.४० किलो सोने केरळ पोलिसांनी साताऱ्यातून हस्तगत केले आहे. येथील सराफांना सोने वितरित केल्याप्रकरणी सराफ राहुल घाडगे आणि डॉ. निलेश साबळे यांना शोधण्यासाठी केरळ पोलिसांनी सातारा पोलिसांचे सहकार्य घेण्याचे ठरवले आहे. त्यासाठी केरळ पोलिसांनी सातारा पोलिस अधीक्षकांना श्री. घाडगे आणि डॉ. साबळे यांचा लवकरात लवकर छडा लावावा, अशी लेखी मागणी केली आहे. गेले वीस दिवस केरळ पोलिस साताऱ्यात तळ ठोकून होते. ही टीम रविवारी रात्री उशीरा केरळकडे रवाना झाली. Gold Robery of Rs 7.5 crore: Police in search of Dr. Nilesh Sable and Rahul Ghadge ...

केरळ राज्यातील पलक्कड जिल्ह्यातील 'मारूथा रोड सहकारी ग्रामीण क्रेडिट सोसायटी'वर दि. २४ जुलै रोजी पडलेल्या दरोड्यात साडेसात किलो सोने आणि अठरा हजारांची रोकड चोरीला गेल्याचा उलगडा दि. २६ जुलै रोजी झाला होता. केरळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये परेश अशोक अंबूर्ले उर्फ निखील अशोक जोशी याचा सहभाग आहे. याचा तपास करताना सोने चोरीचे 'सातारा कनेक्शन' असल्याचे समोर आले. यानंतर केरळ पोलिसांने निखिल जोशी याला सहा ऑगस्ट रोजी पुणे - बंगळूर महामार्गावरील 'हॉटेल फर्न' येथून अटक केली होती. 

दरम्यान, दरोडा टाकणारा संशयित परेश अशोक अंबूर्ले उर्फ निखील अशोक जोशी याला अटक केल्यानंतर त्याची चौकशी सुरू होती. दरोड्यातील काही सोने साताऱ्यातील काही सराफांनी कमी दराने खरेदी केले होते. ज्यांनी खरेदी केली त्यापैकी काही सराफांची नावे केरळ पोलिसांना समजल्यानंतर त्या सराफांची केरळ पोलिसांनी कसून चौकशी केली. या चौकशीतून २.४० किलो सोने हस्तगत केले. हे सोने साताऱ्यातील पंचमुखी परिसरातील सराफ राहूल घाडगे आणि प्रतिभा हॉस्पिटलचे व्यवस्थापन पाहणारा डॉ. निलेश साबळे या दोघांनी संबंधित सराफांना वितरित केले होते.

मात्र, केरळ पोलिसांच्या रडारवर घाडगे आणि साबळे आल्यानंतर ते गायब असून पोलिस त्याचा शोध घेत होते, मात्र, ते सापडलेले नाहीत. केरळ पोलिसांनी ते फरार असल्याचे सांगून त्यांना शोधण्यासाठी सातारा पोलिसांनी सहकार्य करावे, अशी विनंती केली आहे.  दरम्यान, गेले वीस दिवस केरळ पोलिस साताऱ्यात तळ ठोकून होते. ही टीम रविवारी रात्री उशीरा केरळकडे रवाना झाली. सोमवारी ती केरळमध्ये दाखल झाली असून त्यांनी आपला अहवाल सादर करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू ठेवली होती, असे केरळच्या कसबा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक एन. एस. राजीव यांनी सांगितले.
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in