सभासद नोंदणीची तक्रार पोलिसांत करणे हा पब्लिसिटी स्टंट

रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या कार्यकाळात 290 सभासदांची नोंदणी बोगस झाल्याचा ठपका आहे. त्यांना सभासदत्व सिद्ध करण्यासाठी योग्य ती कागदपत्रे सादर करावीत, यासाठी कारखाना प्रशासन दीड वर्षे पाठपुरावा करत आहे.
Going to the police to lodge a complaint about a matter which is under the jurisdiction of the department of co-operation is a mere publicity stunt.
Going to the police to lodge a complaint about a matter which is under the jurisdiction of the department of co-operation is a mere publicity stunt.

कऱ्हाड : सहकार खात्यामार्फत अविनाश मोहिते यांच्या कार्यकाळातील बोगस नोंदणीबाबत चौकशीही सुरू आहे. त्यापासून सभासदांचे लक्ष परावृत्त करण्यासाठी संस्थापक पॅनेलचे प्रमुख प्रशांत पवार यांनी कारखान्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा बनाव रचला आहे. मुळात जी बाब सहकार खात्याच्या अखत्यारित आहे, त्याबद्दल पोलिसांत तक्रार दाखल करायला जाणे म्हणजे निव्वळ पब्लिसिटी स्टंट आहे, अशी टीका कृष्णा कारखान्याने उपाध्यक्ष जगदीश जगताप यांनी केली आहे.  
 
श्री. जगताप यांनी म्हटले आहे, की संस्थापक पॅनेलचे प्रमुख प्रशांत पवार यांनी कृष्णा कारखान्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे 600 पेक्षा जास्त व्यक्तींना सभासदत्व देण्यात आल्याचा आक्षेप घेत याबाबत चौकशी करण्याच्या मागणीचा अर्ज कऱ्हाड पोलिस ठाण्यात दिला आहे.

मुळात जी बाब सहकार खात्याच्या अखत्यारित आहे, त्याबद्दल पोलिसांत तक्रार दाखल करायला जाणे म्हणजे निव्वळ पब्लिसिटी स्टंट आहे. रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या कार्यकाळात 290 सभासदांची नोंदणी बोगस झाल्याचा ठपका आहे. त्यांना सभासदत्व सिद्ध करण्यासाठी योग्य ती कागदपत्रे सादर करावीत, यासाठी कारखाना प्रशासन दीड वर्षे पाठपुरावा करत आहे.

पण, यातील अनेकांनी अद्यापही योग्य कार्यवाही केलेली नाही. सहकार खात्यामार्फत अविनाश मोहिते यांच्या कार्यकाळातील बोगस नोंदणीबाबत चौकशीही सुरू आहे. त्यापासून सभासदांचे लक्ष परावृत्त करण्यासाठी संस्थापक पॅनेलचे प्रमुख प्रशांत पवार यांनी कारखान्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा बनाव रचला आहे. मुळात ज्या प्रकरणाची चौकशी सहकार खात्यामार्फत सुरू आहे आणि जो विषय सहकार खात्याच्या अखत्यारित आहे, त्याबद्दल पोलिसांत तक्रार करणे म्हणजे निव्वळ राजकीय स्टंट असून, तो चोराने उलट्या बोंबा मारण्याचाच प्रकार आहे, असेही जगताप यांनी स्पष्ट केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com