कोंढावळेकरांसाठी मकरंद आबांच्या रूपात देवमाणूस धावला....

पहाटेचे तीन वाजले मुसळधार सरी अंगावर झेलत मकरंद आबा पाय घट्ट रोवून उभे राहिले. कपडेच काय सारे अंग चिखलाने माखले होते.
Godman ran in the form of Makrand Abba for Kondhavalekar ....
Godman ran in the form of Makrand Abba for Kondhavalekar ....

सातारा : वाई तालुक्यातील कोंढावळे गावात दरड कोसळून मातीच्या ढिगाऱ्याखाली माणसे अडकल्याचे समजताच रात्री नऊ वाजता राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांनी भर पावसातच कोंढावळे गावाकडे धाव घेतली. मुसळधार पाऊस, रस्त्यावरून वाहणारे पाण्याचे लोट यातून वाट काढून मकरंद पाटील घटनास्थळी पोहोचले. गाडीतून उतरून चिखल तुडवत किर्रर आंधारात अंगावर पाऊस झेलत मकरंद आबा जागेवर पोहोचले. त्यांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या घरातील लोकांना बाहेर काढण्यास सुरवात केली. पहाटे तीन वाजले तरी धो-धो पावसातही त्यांनी कोणतीही तमा न बाळगता मदतकार्य सुरू ठेवले होते. मकरंद आबांच्या या धैर्याला आणि धाडसाला कोंढावळेकर कधीही विसरणार नाहीत. Godman ran in the form of Makrand Abba for Kondhavalekar ....

सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यात अतिवृष्टी सुरू असून भूस्खलनामुळे अनेक घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाढली गेली आहेत. या ठिकाणी स्थानिक प्रशासन, नागरीक व एनडीआरएफची टीम दाखल होऊन तातडीने मदत कार्य सुरू करण्यात आले आहे. वाईच्या पश्चिम भागात कोंडावळे येथे घरांवर दरड कोसळून काही माणसे अडकलीत अशी माहिती वाई मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मकरंद पाटील (आबा) यांना समजली. त्यांनी कोणताही विचार न करता रात्री नऊ वाजता धो-धो पावसात कोंढावळेकडे धाव घेतली.

गावाकडे जाताना रस्त्यावर पाण्याचे लोट वाहत होते. मुसळधार पाऊस आबांना थांबवू शकला नाही. जाताना जेसीबी, तहसीलदार, वनविभाग अधिकारी यांना तातडीने घटनास्थळी जाण्याची सूचना करत होते. वाटेत कोणी स्थानिक प्रमुख कार्यकर्ते असतील त्यांनाही घटनास्थळी येण्याची सूचना त्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस
चे वाई तालुकाध्यक्ष प्रशांत भोसले पाटील, वाई नगर पालिकेचे उपाध्यक्ष अनिल सावंत,  नगर सेवक चरण गायकवाड, प्रमोद शिंदे, बाळासाहेब चिरगुटेंसह कार्यकर्त्यांची टीम रवाना झाली. गाडी घटनास्थळाजवळ पोहोचत नव्हती. 

त्यामुळे मकरंद आबा गाडीतून उतरले व चालू लागले. वाटेत प्रचंड चिखल किर्रर्र आंधार, आभाळ फटल्यासारखा पाऊस. या परिस्थितीला हरवून मकरंद आबा तेथे पोहोचले. जेसीबी चालेना, पोकलेन बोलावला. स्वतः पुढे होऊन काळजीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या घरातील लोकांना त्यांनी कार्यकर्त्यांच्या मदतीने बाहेर काढण्यास सुरवात केली.

हे काम रात्रभर सुरू होते. पहाटेचे तीन वाजले मुसळधार सरी अंगावर झेलत मकरंद आबा पाय घट्ट रोवून उभे राहिले. कपडेच काय सारे अंग चिखलाने माखले होते. मकरंद पाटील यांच्या या धैर्याला, धाडसाला आणि जनसेवेच्या धडाडीला पाहून वाटले की आबा धावला, आज मी देवमाणूस पाहिला. हे मदत कार्य दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजेपर्यंत सुरू होते. आमदार मकरंद पाटील कोंढावळे ग्रामस्थांच्या मदतीसाठी पाय रोवून उभे होते. 

आज सकाळपासूनच आमदार मकरंद आबा पाटील यांनी देवरुखवाडी येथे घटनास्थळी पुन्हा भेट दिली. तेथे तीन पोकलँड व अनेक टॅक्ट्रर व इतर संसाधन स्वतः चार तास पावसात उभे राहून कामाला लावले. संबधित यंत्रणेने आबांच्या मार्गदर्शनाखाली आठ ते दहा जखमींना बाहेर काढून तात्काळ वाई येथे दवाखान्यात उपचारासाठी रवाना केले. तसेच दोन मृतदेह बाहेर काढले.

आरोग्य, महावितरण व शिक्षण क्षेत्रातील अनेक कर्मचारी यावेळी उपस्थित होते, यावेळी देवरुखवाडी येथील आपदग्रस्तांच्या निवाऱ्याची सोय कोंढावळे शाळेतील वर्गखोल्यात करण्याची सुचना त्यांनी केल्या. यावेळी त्यांच्यासमवेत उपसभापती  भैय्यासाहेब डोंगरे, गटशिक्षणाधिकारी महामुनी, गटविकास अधिकारी कुसुरकर, केंद्रप्रमुख श्री. वैराट, पोतदार व वाशिवली केंद्रातील सर्व शिक्षक, कोंढावळे येथील ग्रामस्थ, तरुण उपस्थित होते. यानंतर आमदारांचा सर्व ताफा किरोंडे व नंतर जांभळीकडे मदतकार्यासाठी रवाना झाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com