शेतकऱ्यांना एकरी 40 हजारांची नुकसान भरपाई द्या : डॉ. भारत पाटणकर 

कधी दुष्काळ, कधी पूर तर कधी अवकाळी पाऊस अशी संकटे काही वर्षांनी पुन्हा पुन्हा येऊन सरकारच्या तिजोरीवर हजारो कोटीचा भार पडत आहे. यासाठी कायम स्वरूपी उपाय योजना करणे आवश्‍यक आहे. यासाठी समन्यायी पाणी वाटपाचा आटपाडी पॅटर्न राज्यभर राबवून सर्व गावातील सर्व कुटुंबाना जीविकेला आवश्‍यक शेतीचे पाणी द्यावे.
Give compensation of Rs 40,000 per acre to farmers says Dr. Bharat Patankar
Give compensation of Rs 40,000 per acre to farmers says Dr. Bharat Patankar

सातारा : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना एकरी 40 हजार रूपये भरपाई तातडीने द्यावी, तसेच पुन्हा पुन्हा आपत्ती येऊन सरकारच्या तिजोरीवर हजारो कोटीचा भार पडत आहे. त्यासाठी कायमस्वरूपी उपाय योजना करावी, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी निवदेनाव्दारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. 

डॉ. पाटणकर यांनी निवेदनात म्हटले की, महाराष्ट्रामध्ये झालेल्या अवकाळी व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सर्वच पिकांचे हातातोंडाशी आलेले उत्पादन पाण्यात भिजून वाया गेले आहे. त्यामुळे वर्षभराचे शेतातील कष्ट वाया जाऊन शेतकऱ्यांना तोटा झाला आहे.

परिणामी शेतकरी सध्या पूर्णपणे खचून गेले आहेत. काही ठिकाणी घरांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने कोणत्याही कागदपत्रांची यादी न मागता तातडीने खावटी अनुदान द्यावे. यासाठी लवकरात लवकर हानी पोचलेल्या शेतकऱ्यांची माहिती घेऊन सरसकट एकरी 40 हजार रूपये तर घरामागे 40 हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी. 

कधी दुष्काळ, कधी पूर तर कधी अवकाळी पाऊस अशी संकटे काही वर्षांनी पुन्हा पुन्हा येऊन सरकारच्या तिजोरीवर हजारो कोटीचा भार पडत आहे. यासाठी कायम स्वरूपी उपाय योजना करणे आवश्‍यक आहे. यासाठी समन्यायी पाणी वाटपाचा आटपाडी पॅटर्न राज्यभर राबवून सर्व गावातील सर्व कुटुंबाना जीविकेला आवश्‍यक शेतीचे पाणी द्यावे. तेवढ्या प्रमाणात पाणी तिकडे वळवता येईल.

नदी, नाले, ओढे यांच्यावर झालेली अतिक्रमणे तातडीने काढण्यात यावीत. त्याचबरोबर सर्व नैसर्गिक प्रवाहांचे तेवढ्याच खोलींचे व रुंदीचे करावेत. हे कार्य आणीबाणीच्या पातळीवर केले पाहिजे. शहरामध्ये सुद्धा या पद्धतीनेच कोणाही हितसंबंधितांचा विरोध न जुमानता काम झाले पाहिजे. यासोबतच समुद्र सपाटीजवळच्या खारेपाट क्षेत्रात समुद्राचे पाणी आत येते.

त्याचा निचरा होण्यासाठी असलेले बंधारे व उघड्या मोडल्यामुळे आणि अतिवृष्टीमुळे शेतात पाणी येऊन नुकसान होते. याच्या नुकसान भरपाई विषयी सुद्धा वेगळा विचार करावा. याची गंभीर नोंद घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा व तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी संतोष गोटल, चैतन्य दळवी उपस्थित होते. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com