ऊर्जामंत्र्यांच्या विरोधात साताऱ्यात फसवणूकीचा गुन्हा; मनसेची सातारा शहर पोलिसांत तक्रार 

जनतेला वेठीस फसविणाऱ्या व खोटे बोलणाऱ्या ऊर्जा मंत्र्याच्या विरोधात प्रजासत्ताक दिनी (ता.26) राज ठाकरे यांच्या आदेशाने सातारा शहर मनसे शाखेने सातारा शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान कऱ्हाड मध्येही मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत व वीज कंपन्यांच्या संचालकांवर लोकांची फसवणूक केल्याबद्दल फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत पोलिसांना निवेदन दिले आहे.
Fraud case against energy minister in Satara; MANSE lodges complaint with Satara city police
Fraud case against energy minister in Satara; MANSE lodges complaint with Satara city police

सातारा : कोरोना काळात उद्योग धंदे, नोकऱ्या ठप्प झाल्या असताना वीज बिल कंपन्यांकडून ग्राहकांना भरमसाठ, अव्वाच्या सव्वा बीले आकारली गेली. यावर ऊर्जा मंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्‍वासन मनसेच्या नेत्यांना दिले होते. मात्र, आश्‍वासन न पाळता त्यांनी घुमजाव केल्याने सर्वांनाच वीजबिले भरावी लागली. यावर मनसे आक्रमक झाली असून जनतेला वेठीस धरून फसविणारे ऊर्जा मंत्री नितीन राऊत व विज वितरण कंपनीच्या संचालकांविरोधात राज ठाकरे यांच्या आदेशानुसार सातारा शहर मनसेने फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा शहराध्यक्ष राहुल पवार यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकाऱ्यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यावेळी ऍड. मुश्‍ताक बोहरी, जिल्हा सचिव राजेंद्र केंजळे, शहर उपाध्यक्ष भरत रावळ, वैभव वेळापुरे, दिलीप मामा सोडमिसे, गणेश पवार, चैतन्य जोशी, अविनाश भोसले, अनिकेत साळुंखे व कार्यकर्ते उपस्थित होते.

तक्रारीत म्हटले की, कोरोना काळात उद्योग धंदे, नोकऱ्या ठप्प झाल्या होत्या. तरीही वीज कंपन्यांकडून ग्राहकांना भरमसाठ, अव्वाच्या सव्वा वीजबिले आकारली गेली. सर्व काही ठप्प असताना अशा बिकट परिस्थिती सर्वसामान्य माणसाला हे बील भरणे केवळ अशक्‍यच होते. जनतेच्या जिव्हाळ्याचा मुद्दा मनसेने हाती घेऊन मनसे नेते बाळा नांदगावकर व पक्षाच्या शिष्टमंडळाने काही दिवसांपूर्वी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची भेट घेऊन चर्चा केली.

त्यावेळी त्यांनी यावर आम्ही नक्की विचार करू व लवकरच गोड बातमी देऊ असे आश्वासन दिले होते. त्यानंतर स्वतः मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे आणि नेते पदाधिकारी यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांची भेट घेऊन याविषयी चर्चा केली होती. त्यांनी यामध्ये लक्ष घालून योग्य तो निर्णय घेऊ, असे सांगितले होते. मात्र, ऊर्जा मंत्र्यांनी स्वतःच्या विधानावरून घुमजाव करत वीजबिल सर्वांना भरावे लागेल, असे सांगितले.

त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते व पदाधिकारी आक्रमक झाले असून जनतेला वेठीस फसविणाऱ्या व खोटे बोलणाऱ्या ऊर्जा मंत्र्याच्या विरोधात प्रजासत्ताक दिनी (ता.26) राज ठाकरे यांच्या आदेशाने सातारा शहर मनसे शाखेने सातारा शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान कऱ्हाड मध्येही मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत व वीज कंपन्यांच्या संचालकांवर लोकांची फसवणूक केल्याबद्दल फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत पोलिसांना निवेदन दिले आहे. 

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com