म्युकरमायकोसिसचे आतापर्यंत साताऱ्यात चार बळी

त्यांच्यावर जंबो कोविड हॉस्पिटल, जिल्हारूग्णालयात उपचार सुरू असून आतापर्यंत चार जणांचा म्युकरमायकोसिसमुळे बळी गेला आहे. तीन जणांनी या आजारावर यशस्वी मात केली आहे. सध्या आठ बाधितांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
Four victims of mucor mycosis in Satara so far
Four victims of mucor mycosis in Satara so far

सातारा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी सामना करताना सातारा जिल्ह्यातील कोरोनाची साखळी (Corona Pandemic) तुटेना झाली आहे. अद्याप बाधितांचा आकडा १८७८ च्या दरम्यान कायम आहे. तर दुसरीकडे म्युकरमायकोसिसचे (Mucor Mycosis)  रूग्ण ही सापडू लागले आहेत. आतापर्यंत १५ जणांना बाधा झाली असून त्यापैकी चार जणांचा बळी गेला आहे. म्युकरमायकोसिसच्या रूग्णांसाठी जिल्हा रूग्णालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे.(Four victims of mucor mycosis in Satara so far)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत साताऱ्यातील बाधितांचा आकडा १७०० ते दोन हजारांच्या आसपास राहात आहे. कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण दररोज ३० ते ४० च्या दरम्यान आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संपूर्ण कुटुंबेच बाधित होण्याचे प्रमाण जिल्ह्यात वाढले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत पातळीवर ३० बेडचा विलगीकरण कक्ष स्थापन करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.

दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही चांगले असून काल दिवसभरात ३१२४ रूग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. पुणे, मुंबईनंतर सातारा जिल्ह्यात ही म्युकरमायकोसिसने तोंडवर काढले आहे. जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांना म्युकरमायकोसिसचा धोका असून जिल्ह्यातील तब्बल १५ रूग्ण यामुळे बाधित झाले आहेत.

त्यांच्यावर जंबो कोविड हॉस्पिटल, जिल्हारूग्णालयात उपचार सुरू असून आतापर्यंत चार जणांचा म्युकरमायकोसिसमुळे बळी गेला आहे. तीन जणांनी या आजारावर यशस्वी मात केली आहे. सध्या आठ बाधितांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्हा रूग्णालयात अशा रूग्णांसाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com