हेच का दुर्गामातेचे रुप, हीच का तुमची ममता; हिंसाचारामुळे बॅनर्जींवर टीका - Is This the form of Goddess Durga, this is your affection; Criticism of Banerjee over violence | Politics Marathi News - Sarkarnama

हेच का दुर्गामातेचे रुप, हीच का तुमची ममता; हिंसाचारामुळे बॅनर्जींवर टीका

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 4 मे 2021

कायदा तोडून गरीब कार्यकर्त्यांवर हल्ला करणे हेच श्रीमती बॅनर्जी यांचे दुर्गामातेचे रुप आहे, असे त्यांना वाटते का, अशी टीका भाजप चे राज्याचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. 

मुंबई : निवडणूक निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या तुफान हिंसाचाराचा प्रसाद लाड, केशव उपाध्ये, चित्रा वाघ आदी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी निषेध केला आहे. गरीब कार्यकर्त्यांचे खून करणे हेच ममता बॅनर्जी यांचे दुर्गामातेचे रुप आहे का, हीच का तुमची ममता, असे टोलेही भाजप नेत्यांनी लगावले आहेत. 

निवडणूक निकालानंतर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी भाजप व भाजपप्रणित संघटनांच्या कार्यालयांवर हल्ले करून हिंसाचार केला आहे. त्यावर, हीच का तुमची ममता, असा टोला भाजप उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी लगावला आहे. हा हिंसाचार रोखता आला असता. हीच तुमची "ममता" असेल तर, विजयानंतर माजवलेला हा उन्माद तुम्हाला अधोगतीकडे घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही", अशी टीका प्रसाद लाड यांनी श्रीमती बॅनर्जी यांच्यावर केली.

पश्चिम बंगालमध्ये स्वतः एकही जागा न जिंकलेले महाराष्ट्रातील कथित पुरोगामी पक्षांचे नेते श्रीमती बॅनर्जी यांना दुर्गामातेची उपमा देत होते. आता या हिंसाचाराबद्दल ते गप्प का आहेत, कायदा तोडून गरीब कार्यकर्त्यांवर हल्ला करणे हेच श्रीमती बॅनर्जी यांचे दुर्गामातेचे रुप आहे, असे त्यांना वाटते का, अशी टीका भाजप चे राज्याचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. 

तर प्रचारमे दुर्गाष्टक गानेवाली श्रीमती बॅनर्जी विजय के बाद बंगालकी माँबहनों के साथ हो रहे बलात्कार को क्यों अनदेखा कर रही है. दीदी के कार्यकर्ता लूट मचा रहे है, मारपीट कर रहे है, तब भी दीदी शांत. ए ना चालबे दीदी, महाराष्ट्र के कथित पुरोगामी नेताओंको क्या यह विध्वंस मंजूर है ? असा टोमणा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी लगावला आहे.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख