...बलिदान दिलेल्यांची तुम्ही हत्या केलीत; नरेंद्र पाटलांना अश्रू अनावर 

आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीला वारंवार सांगत होतो. मात्र अखेर भिती होती तेच झाले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आरक्षण उद्धव ठाकरे यांच्या चुकीच्या नियोजनामुळे गेले.
Following the Supreme Court's decision, Shri. Patil became emotional, he could not hold back his tears.
Following the Supreme Court's decision, Shri. Patil became emotional, he could not hold back his tears.

ढेबेवाडी : मराठ्यांचे आरक्षण गमावून तुम्ही मराठा समाजाचा विश्वासघात तर केलातच शिवाय आरक्षणासाठी पहिले बलिदान दिलेले माझे वडील (कै) आमदार अण्णासाहेब पाटील आणि 42 मराठा तरुणांचीही हत्याही केलीत, अशा शब्दात मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढा देत असलेले माजी आमदार नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी आज राज्य शासनावर तोफ डागली. सर्वोच्च न्यायालयाचा (High Court) निकाल आल्यानंतर श्री. पाटील भावनिक झाले, त्यांना अश्रू आवरता आले नाहीत.  (Following the Supreme Court's decision, Shri. Patil became emotional, he could not hold back his tears.)

गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या लढ्यात ताकदीने उतरून संपर्क दौरे, आंदोलने व बैठकातून जोरदार आवाज उठवणारे नरेंद्र पाटील आज न्यायालयाचा निकाल आल्यानंतर भावनिक झाले. त्यांना अश्रू आवरता आले नाहीत. नरेंद्र पाटील म्हणाले, 'अपेक्षित होतं योग्य युक्तिवाद केल्यानंतर मराठ्यांना न्याय मिळेल, परंतु दुर्भाग्य, खूप वाईट झालं. माझे वडील अण्णासाहेब पाटील यांनी 1982 मध्ये याच आरक्षणासाठी जीव दिला होता. मराठा क्रांती मोर्चानंतर 42 मराठा बांधवांनी बलिदान दिले.

काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात राज्य केले परंतु त्यांनी कधीही आरक्षणाबाबत योग्य पद्धतीने भूमिका मांडली नाही. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीला वारंवार सांगत होतो. मात्र अखेर भिती होती तेच झाले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आरक्षण उद्धव ठाकरे यांच्या चुकीच्या नियोजनामुळे गेले. सकाळपासून लोकं सांगत आहेत की शांत राहा, कोरोना आहे. झोपून राहा-आराम करा. दोन वर्षे कोरोना चालणार आहे. मग दोन वर्षे मुले शाळेत घालवू नका. एमपीएससी, यूपीएससीच्या परीक्षा देऊ नका, अरे कसले तुम्ही नेते आहात, टाळ वाजवा टाळ...'

''खूप वाईट वाटतंय,इतकी माणसे गेली.याप्रश्नी 'वर्षा'वर बसून अगोदर योग्य नियोजन करायला हवे होते पण आता आरक्षण गेल्यावर आमचे नेते तिकडे आरक्षणावर चर्चा करायला गेलेत.आता काय डोंबलं होणार आहे का?.''

- नरेंद्र पाटील (मराठा नेते)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com