ऑक्सिजन गळती दूर्घटनेतील १६ मृतांच्या वारसांना पाच लाखांच्या धनादेशाचे वाटप

ऑक्सिजन दुर्घटनेत मृत झालेल्या 22 रुग्णांपैकी 16 मृतांच्या वारसांना पाच लाख मदतीच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले असून उर्वरीत सहा जणांचे तांत्रिक बाबींची पूर्तता करुन लवकरच त्यांना देखील धनादेश अदा करण्यात येतील, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
Five lakh checks distributed to heirs of 16 victims of oxygen leak accident
Five lakh checks distributed to heirs of 16 victims of oxygen leak accident

नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय येथील ऑक्सिजन गळतीच्या दूर्घटनेत कोविड कक्षातील 22 रुग्णांचा मृत्यु झाला होता. या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत शासनाने जाहीर केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री सहायता निधीतून १६ मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. 

ऑक्सिजन दुर्घटनेत मृत झालेल्या 22 रुग्णांपैकी 16 मृतांच्या वारसांना पाच लाख मदतीच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले असून उर्वरीत सहा जणांचे तांत्रिक बाबींची पूर्तता करुन लवकरच त्यांना देखील धनादेश अदा करण्यात येतील, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

या वारसांना करण्यात आले धनादेशाचे वितरण : ऑक्सिजन दुर्घटनेत मृत झालेले अमरदीप नारायण नगराळे यांचे वारस म्हणून त्यांच्या पत्नी मंगला नगराळे यांना धनादेश अदा करण्यात आलेला आहे. भारती बंडू निकम यांचे वारस म्हणून त्यांची मुलगी तेजस्विनी बंडू निकम, श्रावण रामदास पाटील यांचे वारस म्हणून त्यांच्या पत्नी मालुबाई पाटील यांना धनादेश अदा करण्यात आला आहे. मोहना देवराम खैरनार यांचे वारस म्हणून त्यांचे पती देवराम गणपत खैरनार यांना तर सुनिल भिमा झाल्टे यांचे वारस म्हणून त्यांच्या पत्नी  सुवर्णा झाल्टे यांना धनादेश अदा करण्यात आला आहे.

सल्मा फकीर मोहम्मद शेख यांचे वारस म्हणून त्यांचा मुलगा इरफान फकीर मोहम्मद शेख मुलगा यांना तर भैय्या सांदूभाई सैय्यद यांचे वारस म्हणून त्यांचा मुलगा साहिल सैय्यद यांना धनादेश अदा करण्यात आला आहे. प्रवीण पिरसिंग महाले यांचे वारस म्हणून त्यांच्या पत्नी जयश्री महाले तर मंशी सुरेन्द्र साह यांचे वारस म्हणून त्यांच्या पत्नी  ममता देवी यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले आहे. सुगंधाबाई भास्कर थोरात यांचे वारस म्हणून मुलगा विनोद थोरात तर हरणबाई ताटेराव त्रिभुवन यांचे वारस म्हणून मुलगी संगिता झाल्टे यांना धनादेश अदा करण्यात आला आहे.

रजनी रत्नाकर काळे यांचे वारस म्हणून त्यांचे पती रत्नाकर काळे यांना तर गिता रावसाहेब वाकचौरे यांचे वारस म्हणून त्यांचे पती रावसाहेब वाकचौरे यांना धनादेश अदा करण्यात आला आहे. संदीप हरीश्चंद्र लोखंडे यांचे वारस म्हणून त्यांच्या पत्नी निता संदिप लोखंडे यांना तर बुधा लक्ष्मण गोतरणे यांचे वारस म्हणून त्यांची मुलगी पुष्पा ज्ञानेश्वर माढे, वैशाली सुनिल राऊत यांचे वारस म्हणून त्यांचा मुलगा कृष्णा राऊत यांना धनादेश अदा करण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

ऑक्सिजन दुर्घटनेत मृत झालेले 22 रुग्णांपैकी 16 मृतांच्या वारसांना पाच लाखाच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले आहे. उर्वरीत पंढरीनाथ नेरकर, प्रमोद वालूकर, आशा शर्मा, बापूसाहेब घोटेकर, वत्सलाबाई सुर्यवंशी, नारायण गंगा इराक या सहा मृतांच्या वारसांना तांत्रिक बाबींची पूर्तता करुन धनादेशांचे वितरण करण्यात येणार आहे, असेही श्री. भुजबळ यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com