सातारा लोकसभा मतदारसंघातील विकासासाठी पाच कोटी : श्रीनिवास पाटील 

निधी मंजूर झाल्याने मुलभूत सुविधांच्या कामांना गती मिळणार आहे. खासदार पाटील यांनी केलेल्या शिफारशीनुसार 25/15 योजनेमधून हा निधी मंजूर झाला आहे. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी निधी मंजूर केला आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघातील विकासासाठी पाच कोटी : श्रीनिवास पाटील 
Five crore for development in Satara Lok Sabha constituency: Srinivas Patil

कऱ्हाड : सातारा लोकसभा मतदारसंघातील कऱ्हाड, सातारा, कोरेगाव, वाई, खटाव, जावली, व पाटण तालुक्यातील विविध विकास कामांसाठी पाच कोटींचा निधी मंजूर झाला आहे. लोकसभा मतदारसंघातील गावांतर्गत मुलभूत सुविधांच्या विकास कामांसाठी खासदार श्रीनिवास पाटील यांच्याकडून पाठपुरावा सुरू होता. निधी मंजूर झाल्याने मुलभूत सुविधांच्या कामांना गती मिळणार आहे. खासदार पाटील यांनी केलेल्या शिफारशीनुसार 25/15 योजनेमधून हा निधी मंजूर झाला आहे. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी निधी मंजूर केला आहे. 

कऱ्हाड तालुक्यात उंब्रजला चोरे रस्‍त्यास 10, टेंभू हजारमाची, मसूर, कवठे, कोपर्डे हवेली, कोर्टी, शेरे, घोगाव येथे रस्त्यासाठी प्रत्येकी सात, हिंगनोळे, नडशी, अंतवडी, सवादे, येणपे येथे रस्त्यासाठी प्रत्येकी पाच, खराडे येथे बहुउद्येशीय तर पेर्ले, रेठरे खुर्द, बेलवडे हवेली, म्‍हासोली-भोळेवाडीला सभामंडपासाठी प्रत्येकी 10 लाखांचा निधी मंजूर आहे. 

सातारा तालुक्यातील बोरगाव रस्त्यासाठी 10 लाखाचा निधी मंजूर आहे. सासपडे, गोवे, पाडळी किडगांव, हामदाबाज, मांडवे, चिंचणेर, शिवथर, अति‍त, काशीळ, नागठाणे आदी गावातील अंतर्गत रस्त्यासाठी प्रत्येकी सात लाखांचा निधी मंजूर आहे. आरे तर्फ परळी येथे हायमास्‍टसाठी दोन लाख, मालगाव येथे स्‍मशानभूमी संरक्षण भिंतीसाठी पाच लाख, तर पाटखळ येथे सभा मंडपासाठी 10 लाखाचा निधी मंजूर आहे. 

पाटण तालुक्यातील म्‍हावशी गारवडे, रुवले, नावडी, कुंभारगांव आदी गावांना रस्त्यासाठी प्रत्येकी सात लाख निधी मंजूर झाला आहे. बेलवडे, मेंढोशी, गुढे घोटील (खालचे), आंब्रग, हावळेवाडी, पाळेकरवाडी, कोरीवळे, टेळेवाडी, चाफळ, बनपूरी, सोनाईचीवाडी, निसरे, खिलारवाडी आदी गावात रस्त्यासाठी प्रत्येकी पाच लाखांचा निधी मंजूर आहे. मारुल हवेली येथे बहुउद्देशीय इमारतीसाठी 20 लाख तर पापर्डे येथे अंतर्गत गटर्स बांधण्यासाठी सात लाखांचा निधी मंजूर आहे. 

खटाव तालुक्यातील राजाचे कुर्ले येथे रस्त्यासाठी सात, लाडेगाव, खातगुण रस्त्यासाठी प्रत्येकी पाच, पुसेसावळीला सभामंडपासाठी 10 लाखाचा निधी मंजूर आहे. वाई तालुक्यातील चांदक येथे पाच लाखाचा तर खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे रस्त्यासाठी सात लाखाचा निधी मंजूर आहे.

कोरेगाव तालुक्यातील तारगाव येथे रस्त्यासाठी पाच लाख, जळगांव येथे गटर्स बांधण्यासाठी पाच लाख, नागझरी येथे पेव्‍हर्स ब्‍लॅाकसाठी पाच लाख, बोरगाव व रुई येथे बहुउद्देशीय इमारतीसाठी प्रत्येकी 10 लाख रूपयांचा निधी मंजूर आहे. सिध्‍दार्थनगर, पवारवाडी, साप, देऊर, भोसे येथे रस्त्यासाठी प्रत्येकी सात लाखांचा निधी मंजूर आहे. जावली तालुक्यातील बिभवी येथे रस्‍ता व गटरसाठी सात लाखांचा निधी मंजूर आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in