सातारा नियोजन समितीचा पाच टक्के निधी अतिवृष्टीग्रस्तांसाठी राखीव

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या उपाय योजनांसाठी पाच टक्के निधी रुपये 16 कोटी 72 लाख 50 हजार इतका निधी पुनर्विनियोजित करण्यात आला.
सातारा नियोजन समितीचा पाच टक्के निधी अतिवृष्टीग्रस्तांसाठी राखीव
Five per cent fund of Satara Planning Committee is reserved for excess rainfall measures

सातारा : जिल्हा वार्षिक योजना 2021-22 मधील मंजूर निधीच्या 30 टक्के निधी कोविड उपाय योजनांसाठी व पाच टक्के निधी हा अतिवृष्टी उपाययोजनांसाठी राखून ठेवण्याचा निर्णय आज पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी घेतला. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत उपाय योजनांसाठी हा निधी मंजूर केला. Five per cent fund of Satara Planning Committee is reserved for excess rainfall measures

या बैठकीस वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार पृथ्वीराज चव्हाण, अरुण लाड, मकरंद पाटील, शिवेंद्रसिंहराजे भोसले, महेश शिंदे, दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा नियोजन अधिकारी बी. जे. जगदाळे यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजनेच्या 2021-22 या वर्षासाठी एकूण 375 कोटी इतका निधी अर्थसंकल्पीत आहे. यामधून कोविड उपाय योजनांसाठी 30 टक्के निधी रुपये 98 कोटी तीन लाख दोन हजार तसेच जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या उपाय योजनांसाठी पाच टक्के निधी रुपये 16 कोटी 72 लाख 50 हजार इतका निधी पुनर्विनियोजित करण्यात आला. 

जिल्हा वार्षिक योजनेतून अर्थ संकल्पीत झालेल्या निधीचा वेळेत खर्च करण्यासाठी तसेच त्यातून घेण्यात येणारी कामे वेळेत होण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेसाठी लवकरात लवकर प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर करावीत. कामे लवकर पूर्ण होण्यासाठी कामाची वर्क ऑर्डरही वेळेत द्या, अशी सूचना त्यांनी केली. 

जिल्हा वार्षिक योजनेतून मिळालेला निधी खर्च 100 टक्के करा, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. पाटील यांनी बैठकीत केल्या. आयत्या वेळेच्या विषयामध्ये मौजे मसूर (ता. कराड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धनाने ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या मान्यतेने प्रस्ताव आरोग्य संचालनालयास पाठविण्यासाठी मान्यता देण्यात आली. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in