अग्निशमन अधिकारी कृष्णात यादव यांचा राष्ट्रपती शौर्य पदकाने सन्मान  

श्री. यादव यांनी सुरवातीपासून अग्निशामन दलात प्रामाणिकपणे काम करून सेवा बजावली आहे.
अग्निशमन अधिकारी कृष्णात यादव यांचा राष्ट्रपती शौर्य पदकाने सन्मान  
Fire officer Krishnat Yadav honored with President's Bravery Medal

कऱ्हाड : मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे विभागीय अग्निशमन अधिकारी व कऱ्हाड तालुक्यातील साकुर्डी गावचे सुपुत्र कृष्णात रामचंद्र यादव यांना अग्निशमन सेवेचे राष्ट्रपती शौर्य पदक आज जाहीर झाले. मुंबईतील फोर्ट परिसरातील भानुशाली इमारतीखाली सापडलेल्या अनेक नागरिकांची सुखरुप सुटका केल्याबद्दल त्यांना हे पदक जाहीर झाले आहे. Fire officer Krishnat Yadav honored with President's Bravery Medal

मुंबई महापालिकेत श्री. यादव हे १९९३ च्या बॅचचे अधिकारी आहेत. प्रशासकीय कामकाज चोखपणे बजावताना ऑपरेशनल बाजूही ते समर्थपणे सांभाळतात. अग्निशमन दलाचे मुख्यालय असलेल्या भायखळा अग्निशमन केंद्राचे कार्यभारी पद त्यांनी चांगल्या पध्दतीने सांभाळले.

२०१९ साली सांगली येथे आलेल्या महापुरात मदतीसाठी धावून गेलेल्या मुंबई अग्निशमन दलाच्या पथकाचे त्यांनी नेतृत्व केले होते. त्याचबरोबर मुंबईतील पोर्ट परिसरातील भानुशाली इमारत कोसळली होती. त्याखाली फसलेल्या लोकांची सुटका करण्याची मोलाची कामगिरी त्यांच्यासह सहकाऱ्यांनी बजावली होती.

त्यावेळी श्री. यादव व त्यांच्या पथकाने जीवाची बाजी लावून तेथे कामगिरी बजावली होती. त्याची दखल घेऊन त्यांचा राष्ट्रपती शौर्य पथकाने भारत सरकारने सन्मान केला आहे. श्री. यादव यांनी सुरवातीपासून अग्निशामन दलात प्रामाणिकपणे काम करून सेवा बजावली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात मी 28 वर्षे काम करत आहे. चांगल्या सेवेबद्दल यापुर्वीही पुरस्कार मिळाले आहेत. मात्र मुंबईतील भानुशाली बिल्डींगमधील चांगल्या कामगिरीबद्दल राष्ट्रपती शौर्य पदक मला जाहीर झाले. त्यामुळे या सेवेचे आणि कष्टाचे चीज झाले. 

- कृष्णात यादव
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in