अखेर आंबेघरला एनडीआरएफची टीम पोहोचली; सहा मृतदेह शोधण्यात यश

आंबेघरला लागून असलेला डोंगर कोसळने गावाच्या अलीकडे तीन किलोमीटरपर्यंत राडारोडा पसरला होता. सर्वत्र चिखलाचा खच होता. त्यामुळे जेसीबीसह कोणतीच यंत्रणा कोणती तेथे पोहोचू शकली नाही.
अखेर आंबेघरला एनडीआरएफची टीम पोहोचली; सहा मृतदेह शोधण्यात यश
Finally the NDRF team reached Ambeghar; Success in finding six bodies

मोरगिरी :  मुसळधार पावसाने भुस्खलनात गाडल्या गेलेल्या पाटण तालुक्यातील आंबेघर तर्फ मरळी गावात मदत कार्यास स्थानिक स्वयंसवेकासह एनडीआऱएफच्या पुढाकाराने सुरवात झाली. दुपार एकवाजेपर्यंत सहा मृतदेह शोधण्यात यश आले. त्यात दोन लहान मुलींचाही समावेश होता. गावात साचलेला राडारोडामुळे मदत कार्यात अडचणी येत होती. गावात दोन किलोमीटर अळीकडून चालत जावे लागते. दुपारी जिल्हाधिकारी शेखर सिंह येथे पोचले. त्यांनीही गावाला भेट दिली आहे. तहसीलदार योगेश्वर टोम्पे व त्यांचेही सहकारी तेथे मदत कार्यात सहभागी होते. Finally the NDRF team reached Ambeghar; Success in finding six bodies

आंबेघर गावात आज सकाळी साडेअकराच्या सुमारास एनडीआरएफचे पथक पोचले. दुपारी एक वाजेपर्य़ंत सहा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. अद्यापही सहा जण बेपत्ता आहेत. भूस्खलानेन येथे मोठ्या प्रमाणात राडारोड आहे. जवळपास तीस फुटाच्या आसपासचा राडारोडा हलविल्यानंतर मृतदेह सापडले आहेत. तेथील स्थिती अत्यंत विदारक होती. स्वयंसेवकांनी खोऱ्यांच्या सहाय्याने चिखल हलविला. आंबेघरकडे येणाऱ्या रस्त्यावरील नदीचे पाणी ओसरल्याने थेट वाट होती. त्यामुळे जिल्ह्यातील स्वयंसेवक येथे सकाळपासून दाखल झाले होते. 

सातारा, कऱ्हाडसह जिल्ह्याच्या अन्य भागातूनही एनेकजण मदतीसाठी धावले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गतीने मदत कार्या राबविण्याचे काम सुरू होते. अवघ्या १० उंबऱ्याच्या आंबेघर तर्फ मरळी गावात काल पहाटे भूस्खलन झाले. डोंगराचा मोठा भाग कोसलळ्याने गावातील गावात ​चार कुटुंबे गुराढोरासहीत वाहून गेल्याची भीती व्यक्त होत होती. चार कुटूंबातील १४ जण बेपत्ता आहेत. भूस्खलनाने राडोरोड्यात ती गाडली गेली असावीत, अशी भिती व्यक्त होत होती. ती आज खरी ठरली. गावाला चारही बाजूने पाण्याने वेढल्याने तेथे काल कोणतेच मदत कार्य पोचू शकली नाही. तर आज तेथील राडारोडामुळे मदत कार्यात अडचण येत होती. काल एनडीआरएफचे पथकही मदतीस पोचू शकले नव्हते. 

आंबेघरला येणाऱ्या दोन्ही मार्गावरील पुल पाण्याखाली गेले होते. दोन दिवसांच्या  मुसळधार पावसाने तालुक्यात हाहाकार माजवला असतानाच भुस्खलनाचा धोक्यात गाव वाहून गेले होते. गावातील १० पैकी सहा कुटुंब सुरक्षित स्थळी हलवण्यात स्थानिकांना पातळीवर लोकांना यश आले. पहाटे दोननंतर अंधारात झालेले गोंधळ उडाला. भुस्खलनात चार कुटुंब त्याच बेपत्ता आहेत. कोसळलेल्या डोंगर गावात संकट घेऊन आला. त्या डोंगराच्या राडारोडा मध्ये आख्खं गाव गडप झालं. त्यामध्ये ही चार कुटुंब त्यांच्या गुराढोरासहीत गाडल्याची भीती तहसीलदार योगेश टोम्पे यांनी व्यक्त केली होती. 

आंबेघरला लागून असलेला डोंगर कोसळने गावाच्या अलीकडे तीन किलोमीटरपर्यंत राडारोडा पसरला होता. सर्वत्र चिखलाचा खच होता. त्यामुळे जेसीबीसह कोणतीच यंत्रणा कोणती तेथे पोहोचू शकली नाही. परिणामी स्थानिक नागरिकांनी एकमेकाला मदत करत सहा कुटुंबांना जीवदान मिळाले. त्यांना गोकुळ येथे सुरक्षित स्थळी हलवले आहे. चार कुटुंबातील किमान १४ सदस्य बेपत्ता आहेत. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे कालपासून एनडीआरएफचे शर्थीचे आंबेघरला पाठवण्याचे प्रयत्न सुरू होते. मुसळधार पावसासह सर्वच पूल पाण्याखाली गेल्याने त्या पथकाला गावात पोचण्यास अडचणी येत होत्या.

मात्र पावसाने आज उसंत दिली. तर नद्यांचेही पाणी ओसरल्याने थोडासा दिलासा मिळाला. एनडीआरएफच्या पथकासहीत जिल्ह्यातील विविध संस्थाचे स्वेयसेवकही आंबेघरला पोचले. तहसीलदार टोपे पोचले आहेत. स्थानिकांच्या सहकार्याने मदत कार्य सुरू झाले. त्यावेळी येणारे स्वंयसेवकही हातभार लावत होते. त्याचवेळी एनडीआरएफचे पथकही तेथे पोचले. सर्वांच्या मदतीने दुपारपर्तंय तेथून सहा मृतदेह शोधण्यास त्यांना यश आले. त्य़त दोन लहान मुलींचाही समावेश आहे. अधिक गतीने शोधकार्य सुरू होते. जेसीबीसहीत लोकही तेथे हातभार लावत होते. 


एनडीआरएफचे पथक येथे पोचले आङे. त्यापूर्वीच येथे मदत कार्य सुरू जाले आहे. मात्र पथक आल्याने त्याला गती आली आहे. राडरोडा व मलमा हटवून सहा मृतदेह बाहेर काढण्यात यस आले आहे. अद्यापही आठ जण बेपत्ता आहेत. त्यांना शोधण्याचे काम सुरू आहे. 

- योगेश्वर टोपे (तहसीदार, पाटण)

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in