आरटीपीसीआर चाचणीचा केला बनावट अहवाल; पाच जणांवर गुन्हा दाखल - Fake report of RTPCR test; Five people have been charged | Politics Marathi News - Sarkarnama

 आरटीपीसीआर चाचणीचा केला बनावट अहवाल; पाच जणांवर गुन्हा दाखल

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 28 मे 2021

या पाच संशयितांनी 14 आणि 15 ऑक्टोबर 2020 या कालावधीत साताऱ्यातील क्रांतीसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयात कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी केल्याचा बनावट रिपोर्ट मिळवला. मात्र, शासकीय रुग्णालयात या संशयितांनी ही टेस्ट केल्याची कोणतीही नोंद नव्हती.

सातारा : साताऱ्यातील क्रांतीसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयात कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी केल्याचा बनावट (RTPCR Test) अहवाल काही जणांनी मिळवला आहे. याप्रकरणी रुग्णालयाचे डॉ. ज्ञानेश्वर हिरास (Dr. Dyaneshwar Hiras) यांच्या तक्रारीवरुन पाच संशयितांवर सातारा शहर पोलिसांत (Satara City Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  Fake report of RTPCR test; Five people have been charged

पाच संशयितांमध्ये महेश रामचंद्र जाधव (अंबवडे, ता. सातारा), हरिदास नाथा कुंभार (नागझरी, ता. कोरेगाव), प्रमोद आनंदराव माने (रा. कुमठे ता. सातारा), अजय संजय डुबल (शिवाजीनगर) आणि गणेश प्रकाश घोरपडे (निसराळे ता. सातारा) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

हेही वाचा :  देशातील 108 कोटी जनतेला डिसेंबरपर्यंत कोरोना लस देणार; जावडेकरांची घोषणा

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या पाच संशयितांनी 14 आणि 15 ऑक्टोबर 2020 या कालावधीत साताऱ्यातील क्रांतीसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयात कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी केल्याचा बनावट रिपोर्ट मिळवला. मात्र, शासकीय रुग्णालयात या संशयितांनी ही टेस्ट केल्याची कोणतीही नोंद नव्हती. त्यामुळे या प्रकरणाची प्रशासनाकडून सखोल चौकशी करण्यात आली. त्यामध्ये हे रिपोर्ट बनावट असल्याचे समोर आले आहे. 

आवश्य वाचा : सभापतीच्या हल्ल्यानंतर राजगुरुनगरमध्ये दंगलविरोधी पथकाचा बंदोबस्त

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख