पोलिस अधीक्षकांच्या नावे फेक फेसबुक अकाउंट

यापूर्वी तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या नावे फेक अकाउंट उघडण्यात आले होते. तेव्हा त्या अकाउंटवरून अनेकांना आर्थिक मदतीबाबत आवाहन करून पैसे गोळा करण्याची शक्कल संबंधिताने लढविली होती; मात्र तत्काळ त्याचा शोध घेऊन हा प्रकार हाणून पाडला होता.
SPs Fake Facebook account in Ratnagiri
SPs Fake Facebook account in Ratnagiri

रत्नागिरी : जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग (Supritendent of Police) यांच्या नावे बोगस फेसबुक अकाउंट (Facebook Account) काढल्याचे उघड झाले आहे. या अकाउंटवरून अनेकांना रिक्वेस्ट पाठविल्या जात आहेत; मात्र त्या स्वीकारू नये, असे आवाहन केले आहे. पोलिस अधिकाऱ्यांचे फेक अकाउंट काढण्याचा हा दुसरा प्रकार आहे. यापूर्वी तत्कालीन उपविभागिय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांचे फेक फेसबुक अकाउंट काढले होते. (Fake Facebook account in the name of the Superintendent of Police)

जनतेची सायबर फसवणूक होऊ नये, यासाठी जिल्हा पोलिस दल अनेक उपक्रम राबवित आहे; मात्र सायबर फसवणुकीबाबत जनजागृती करणाऱ्या जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्याच नावाने फेसबुकवर फेक अकाउंट काढल्यात आले आहे. त्यांच्या नावाने कोणीतरी फेसबुक अकाउंट काढल्याचे काल उघड झाले आहे. 

या नावाने जर रिक्वेस्ट आली तरी कोणीही स्वीकारू नये, असे आवाहन डॉ. गर्ग यांनी केले आहे. नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर करताना जपून करावा व काही गैरप्रकार आढळल्यास तत्काळ रत्नागिरी सायबर सेलच्या 8888905022 या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. पोलिस दलातील हा दुसरा प्रकार आहे. 

यापूर्वी तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या नावे फेक अकाउंट उघडण्यात आले होते. तेव्हा त्या अकाउंटवरून अनेकांना आर्थिक मदतीबाबत आवाहन करून पैसे गोळा करण्याची शक्कल संबंधिताने लढविली होती; मात्र तत्काळ त्याचा शोध घेऊन हा प्रकार हाणून पाडला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com