फडणवीस, पाटील यांना खास सुरक्षेची गरज नाही, कार्यकर्ता हीच त्यांची सुरक्षितता - Fadnavis and Patil do not need special security, BJP workers are their security | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

फडणवीस, पाटील यांना खास सुरक्षेची गरज नाही, कार्यकर्ता हीच त्यांची सुरक्षितता

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 10 जानेवारी 2021

श्री. बापट म्हणाले, राष्ट्रवादीकडे पैसा आहे. त्यामुळे ते पैसा देऊन स्वागत करतात. आम्ही बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले आहे.  

सातारा : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना खास सुरक्षेची गरज नाही, कार्यकर्ता हीच त्यांची सुरक्षितता आहे, अशा शब्दात भाजपचे खासदार गिरिश बापट यांनी महाविकास आघाडी सरकारने भाजपच्या बड्या नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केल्याची खिल्ली उडवली.

खासदार गिरिश बापट यांनी आज सातारा जिल्ह्यात तालुकानिहाय ग्रामपंचायत निवडणूकीचा आढावा घेतला. यानंतर त्यांच्याशी पत्रकारांनी
संवाद साधला. ते म्हणाले, सातारा जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीत भाजप प्रभावीपणे उतरली असून अनेक ठिकाणी आमचे सदस्य बिनविरोध आलेले आहेत.

आम्ही सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानत नाही. आमदार रोहित पवार यांनी बिनविरोध ग्रामपंचायतींना पैसे देत आहेत, तसे भाजपकडून काय दिले जाणार आहे, या प्रश्नावर श्री. बापट म्हणाले, राष्ट्रवादीकडे पैसा आहे. त्यामुळे ते पैसा देऊन स्वागत करतात. आम्ही बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले आहे.  

भाजपच्या बड्या नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत राज्य सरकारने कपात केली आहे. या संदर्भात श्री. बापट यांना विचारले असता ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना खास सुरक्षेची गरज नाही. कार्यकर्ता हीच त्यांची सुरक्षितता आहे. 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख