Extraterrestrials who came to sell gold attacked the police
Extraterrestrials who came to sell gold attacked the police

सोने विक्रीसाठी आलेल्या परप्रांतीयांचा पोलिसावर हल्ला

चार संशयित इसम रस्त्याच्या कडेला उभे असल्याचे दिसले. श्री. मोरे यांनी त्यांची विचारपूस केली. यावेळी या चार संशयितांनी श्री. मोरे यांना शिवीगाळ करुन लाकडीदांडकी व गजाने मारहाण करुन जखमी केले. त्यातील एकाने मोरे यांच्या उजव्या हाताचा चावाही घेतला. त्यानंतर संबंधित परप्रांतीय पळून गेले.

उंब्रज : सोन्याची विक्री करण्यासाठी आलेल्या चार परप्रांतीयांनी पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण केल्याची घटना काल (शुक्रवारी) रात्री पेरले (ता. कऱ्हाड) जवळील शिरगांव रस्त्यावर घडली आहे. मारहाण केल्यानंतर संबंधित परप्रांतीय पळून गेले आहेत. तर जखमी पोलिस कर्मचाऱ्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाटणचे पोलिस उपअधीक्षक अशोकराव थोरात यांनी रुग्णालयात जाऊन संबंधित कर्मचाऱ्याची प्रकृतीची विचारपुस केली.

यासंदर्भात हवालदार मुकेश संभाजी मोरे यांनी उंब्रज पोलिस ठाण्यात याबाबतची फिर्याद दिली आहे. त्यामध्ये म्हटले की, पाटण पोलिस ठाण्यात कार्यरत असणारे पोलिस कर्मचारी मुकेश मोरे हे शासकीय कामानिमित्त साताराकडे त्यांच्या खाजगी वाहनाने निघाले होते. त्यांना बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार पेरले गांवच्या हद्दीत सोन्याच्या विक्रीसाठी काही परप्रांतीय युवक येणार असल्याची माहिती मिळाली होती.

याची पडताळणी करत असताना त्यांना संबंधित चार संशयित इसम रस्त्याच्या कडेला उभे असल्याचे दिसले. श्री. मोरे यांनी त्यांची विचारपूस केली. यावेळी या चार संशयितांनी श्री. मोरे यांना शिवीगाळ करुन लाकडी
 दांडकी व गजाने मारहाण करुन जखमी केले. त्यातील एकाने मोरे यांच्या उजव्या हाताचा चावाही घेतला. त्यानंतर संबंधित परप्रांतीय पळून गेले. 

याबाबत श्री. मोरे यांनी पोलिस ठाण्याशी संपर्क करून ही माहिती दिली. त्यानंतर जखमी मोरे यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. संबंधित चार संशयितांविरोधात उंब्रज पोलिस ठाण्यात गु्न्हा दाखल झाला आहे. पाटणचे पोलिस उपाधिक्षक अशोकराव थोरात यांनी रुग्णालयात भेट
देऊन श्री. मोरे यांच्या प्रकृतीची विचारपुस केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com