गृहराज्यमंत्र्यांच्या मतदारसंघात सापडली स्फोटके; अवैध उत्खननप्रकरणी सात क्रशरवर कारवाई - Explosives found in Home Minister's constituency; Action on seven crushers in illegal excavation case | Politics Marathi News - Sarkarnama

गृहराज्यमंत्र्यांच्या मतदारसंघात सापडली स्फोटके; अवैध उत्खननप्रकरणी सात क्रशरवर कारवाई

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 5 मार्च 2021

हारुगडेवाडीच्या हद्दीत विनापरवाना अवैधरीत्या उत्खनन करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार दोन क्रेशरवर छापा टाकून ते सील करण्यात आले. याशिवाय त्या ठिकाणचे सात पोकलेन आढळले असून तेही सील करण्यात आले आहेत. संबंधित क्रेशरची परवानगी रॉयल्टी भरण्याबाबतच्या पावत्या यांची शहानिशा करून पुढील कारवाई करण्यात येईल.

मल्हारपेठ : पाटण तालुक्यातील नवारस्ताजवळील हरगुडेवाडी गावच्या हद्दीतील सात खडी क्रशरवर अवैधरीत्या उत्खनन सुरू असल्याची माहिती पाटणचे तहसीलदार योगेश्वर टोपे यांना मिळाली होती. या सात क्रशरवर महसूल विभागाच्या पथकाने धडक कारवाई करत ते सील केले. सात पोकलेन मशिन व ६६ स्फोटकांचे बॉक्‍स जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती तहसीलदार टोपे यांनी आज दिली. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंच्या मतदारसंघात अवैध उत्खनन व स्फोटके सापडल्याने खळबळ उडाली आहे. 

हारुगडेवाडीच्या हद्दीत बुधवारी रात्री महसूल व पोलिस प्रशासनाने संयुक्त ही कारवाई केली. घटनास्थळी तहसीलदार टोपे, पोलिस उपअधीक्षक अशोकराव थोरात, पाटण पोलिस निरीक्षक एन. आर. चौखंडे, वैभव सोनावणे, सीताराम कदम, संजय दूधगावकर, तलाठी निवास देशमुख, अमोल पांचाळ, महेश घोरपडे उपस्थित होते.

तहसीलदारांनी सांगितले की हारुगडेवाडीच्या हद्दीत विनापरवाना अवैधरीत्या उत्खनन करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार दोन क्रेशरवर छापा टाकून ते सील करण्यात आले. याशिवाय त्या ठिकाणचे सात पोकलेन आढळले असून तेही सील करण्यात आले आहेत. संबंधित क्रेशरची परवानगी रॉयल्टी भरण्याबाबतच्या पावत्या यांची शहानिशा करून पुढील कारवाई करण्यात येईल.

दरम्यान, खाणीसाठी वापरण्यात येणाऱ्या स्फोटकाचे ६६ बॉक्स मिळून आले आहेत. त्याच्याही आवश्‍यक परवान्यांची तपासणी करण्यात येणार असून याबाबत पोलिस प्रशासनाने ही स्फोटके ताब्यात घेतली आहेत. सलग दुसऱ्या दिवशीही पुन्हा पाच क्रेशरवर कारवाई करण्यात आली असल्याचे तहसीलदार टोपे यांनी सांगितले.  गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंच्या मतदारसंघात अवैध उत्खनन व स्फोटके सापडल्याने खळबळ उडाली आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख