साताऱ्यात अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनची स्थापना; उदयनराजेंच्या हस्ते गुरूवारी उद्‌घाटन

अण्णासाहेब पाटील यांचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांच्याच नावाने विकास फाऊंडेशनची स्थापना केली आहे. गुरुवारी (ता. २८) सकाळी अकरा वाजता खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते व खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत फाऊंडेशनचे उदघाटन होईल. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (स्व) यशवंतराव चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.
Establishment of Annasaheb Patil Vikas Foundation in Satara for justice of Maratha community
Establishment of Annasaheb Patil Vikas Foundation in Satara for justice of Maratha community

ढेबेवाडी : राजकीय विचारांना अलिप्त ठेऊन मराठा समाज आणि कष्टकऱ्यांना सरकार दरबारी न्याय मिळवून देण्यासाठी अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनची स्थापना केल्याची घोषणा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आज केली. गुरुवारी (ता.28) सातारा येथे फाऊंडेशनचे उद्‌घाटन होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

नरेंद्र पाटील म्हणाले, 'एका छोट्याशा गावातील गरीब कुटुंबात जन्मलेल्या अण्णासाहेब पाटील यांनी पोटापाण्यासाठी मुंबईत हमाली करत असताना माथाडी कामगारांना संघटीत करून त्यांना कायद्याचे संरक्षण मिळवून दिले. 1980 मध्ये त्यांनी मराठा महासंघाची स्थापना केली. आर्थिक निकषावर आरक्षणासाठी 22 मार्च 1982 रोजी त्यांनी भव्य मोर्चा काढला होता.

मराठा समाजाला न्याय मिळाला नाही तर मी दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय पहाणार नाही, असे त्यावेळी ठणकावून सांगणाऱ्या अण्णासाहेबांनी दुसऱ्या दिवशी पहाटे स्वतःचे जीवन संपवले. संपूर्ण महाराष्ट्र अण्णासाहेबांचे कार्य जाणतो. विधान परिषदेवर आणि अण्णासाहेब पाटील महामंडळावर काम करताना हे कार्य पुढे नेण्याची संधी मला लाभली. मराठा समाज काय हाल
भोगतोय हे जवळून बघायला मिळाले. अनेक प्रश्न आहेत.

आरक्षणाबाबत न्यायालयात व्यवस्थित बाजू मांडली जात नाही. ईडब्ल्यूएस सारखे पर्याय सरकार सुचवत असले तरी त्याने मूळ आरक्षणाला धक्का लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. कष्टकरी, माथाडी कामगार व मराठा समाजाच्या प्रश्नाची सोडवणूक करून न्याय मिळवून देण्यासह महामंडळाच्या विविध योजना तरुणांपर्यंत पोहचवून राज्यात एक लाख मराठा उद्योजक तयार करण्यासाठी तसेच अण्णासाहेब पाटील यांचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांच्याच नावाने विकास फाऊंडेशनची स्थापना केली आहे.

गुरुवारी (ता. २८) सकाळी अकरा वाजता खासदार उदयनराजे भोसले यांच्या
हस्ते व खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत फाऊंडेशनचे उदघाटन होईल. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (स्व) यशवंतराव चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com