फेरफारसाठी तीनशे रूपयांची लाच स्वीकारताना कक्षपाल जाळ्यात - Employees caught accepting bribe of Rs 300 for modification paper | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूजा चव्हाण मृत्यप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

फेरफारसाठी तीनशे रूपयांची लाच स्वीकारताना कक्षपाल जाळ्यात

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

आज दुपारी पथकाने बडेकर याच्या कार्यालयात सापळा रचला. त्यावेळी बडेकरला 300 रूपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. लाचलुचपत प्रतिंबध विभागाचे पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के, हवालदार विनोद राजे, संभाजी काटकर, निलेश येवले यांनी सापळा रचून ही कारवाई केली.

कऱ्हाड : फेरफार उताऱ्याच्या नकला देण्यासाठी आठशे रूपयांची मागणी करून तीनशे रूपयांची लाच घेताना कऱ्हाड तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. महेश्वर बडेकर (रा, शास्त्रीनगर, मलकापूर) असे संबंधित कर्मचाऱ्याचे नाव आहे. बडेकर हा अभिलेख कक्षपाल आहे. 

तक्रारदाराला त्याच्या जमिनीच्या कागदांच्या फेरफारच्या उताऱ्याच्या नकला हव्या होत्या. त्यासाठी अभिलेख कक्षापाल बडेकरने तक्रारदाराकडे 800 रूपयांची मागणी केली होती. बडेकरने तक्रारदाराकडून सोमवारी 500 रूपये स्विकारले होते. उरलेले 300 रूपये आज (मंगळवारी) देण्याचे ठरले होते. त्याची संबंधीत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली.

त्यानुसार आज दुपारी पथकाने बडेकर याच्या कार्यालयात सापळा रचला. त्यावेळी बडेकरला 300 रूपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. लाचलुचपत प्रतिंबध विभागाचे पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के, हवालदार विनोद राजे, संभाजी काटकर, निलेश येवले यांनी सापळा रचून ही कारवाई केली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख