'कृष्णा'ची निवडणूक; माजी अध्यक्ष अविनाश मोहितेंसह २३ जणांचे अर्ज

उद्या (शुक्रवार), सोमवार व मंगळवार असे दिवस आहेत. आजचा दिवस गेला आहे, असे निवडणुक निर्णय अधिकारी प्रकाश आष्टेकर यांनी सांगितले.आज दिवसभारत 23 अर्ज दाखल झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
'कृष्णा'ची निवडणूक; माजी अध्यक्ष अविनाश मोहितेंसह २३ जणांचे अर्ज
Krishna Sugar Factory election

कऱ्हाड : शिवनगर येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यासाठी (Krishna Sugar factory) आज माजी अध्यक्ष अविनाश मोहिते (Avinash Mohite) यांच्यासह 23 जणांना अर्ज दाखल केले. त्यात दोन विद्यमान संचालकांचाही समावेश आहे. दिवसभरात तब्बल 120 अर्जांची विक्री झाली आहे. आजअखेर 247 अर्जांची विक्री झाली आहे. Election of 'Krishna'; 23 applications including former president Avinash Mohite

कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी विद्यमान संचालकांसह सहा जणांनी अर्ज दाखल केले होते. शासकीय सुट्टी दिवशी अर्ज भरले जाणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आज अर्ज पुन्हा भरण्यास सुरवात झाली. आजच्या दिवशी 23 अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे आता अर्ज भरण्यास मोजकेच तीन दिवस शिल्लक आहेत.

त्यात उद्या (शुक्रवार), सोमवार व मंगळवार असे दिवस आहेत. आजचा दिवस गेला आहे, असे निवडणुक निर्णय अधिकारी प्रकाश आष्टेकर यांनी सांगितले. आज दिवसभारत 23 अर्ज दाखल झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आजच्या दिवशी कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी रेठरे बुद्रुक-शेणोली गटातून अर्ज भरला आहे. त्यांच्या आई नूतन मोहित यांनीही त्याच गटासह महिला राखीव मधून अर्ज भरला आहे. त्या शिवाय शिवाजी आवळे (शिरटे) या विद्यमान संचालकानेही अर्ज भरला आहे. महिला राखीव मधून डबल अर्ज भरले आहेत.

गटनिहाय भरलेले अर्ज असे : वडगांव हवेली - दुशेरे गट : उत्तम विष्णू खबाले, उत्तम तुकाराम पाटील. काले-कार्वे गट : अमरसिंह बाळासाहेब थोरात, विजय निवृत्ती पाटील. रेठरे हरणाक्ष-बोरगाव गट : जयवंत दत्तात्रय मोरे, शिवाजी आप्पासाहेब पवार, संभाजी भगवान दमामे, मिनाक्षीदेवी संभाजी दमामे, मानाजी प्रल्हाद पाटील, पोपट रंगराव थोरात.

येडेमच्छिंद्र-वांगी गट : बाबासाहेब वसंतराव पाटील. रेठरेबुद्रुक शेणोली गट : अविनाश जगन्नाथ मोहिते, नूतन जगन्नाथ मोहिते. अनुसूचित जाती जमाती राखीव : शिवाजी उमाजी आवळे, बाजीराव आबा वाघमारे. महिला राखीव गट : नूतन जगन्नाथ मोहिते, अर्चना अविनाश मोहिते, क्रांती तानाजी पाटील, मिनाक्षीदेवी संभाजी दमामे. इतर मागासप्रवर्ग गट : वसंतराव बाबुराव शिंदे. विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्ग गट : अमोल काकडे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in