Eight victims of heavy rains in Satara district, two missing; Landslides in Patan, Wai, Jawali, Mahabaleshwar
Eight victims of heavy rains in Satara district, two missing; Landslides in Patan, Wai, Jawali, Mahabaleshwar

सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीचे आठ बळी, दोघे बेपत्ता; पाटण, वाई, जावळी, महाबळेश्वरात भूस्खलन

जिल्ह्यात होणाऱ्या अतिवृष्टीमध्ये तात्काळ शोध व बचावकार्यास मदत होणार आहे.अतिवृष्टीमुळे नागरिकांनी पुढील प्रमाणे काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनमार्फत करण्यात आले आहे.

सातारा : अतिवृष्टीमुळे पाटण, जावळी, महाबळेश्वर, वाई तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर जिवित व वित्तहानी झालेली आहे. सद्य:स्थितीत मिरगांव येथील एकाचा मृत्यू झाला आहे. भूस्खलनाखाली गाडल्या गेलेल्या व्यक्तींची निश्चित संख्या सांगता येत नाही. या ठिकाणी एनडीआरएफचे एक पथक आणि स्थानिक प्रशासन, नागरिकांच्यामार्फत युध्दपातळीवर शोध व बचावकार्य चालू आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात आठ व्यक्तींचा मृत्यू झाला असून दोघे बेपत्ता आहेत. आतापर्यंत एनडीआरएफच्या जवानांनी 27 नागरिकांची सुटका केली आहे. Eight victims of heavy rains in Satara district, two missing; Landslides in Patan, Wai, Jawali, Mahabaleshwar

सातारा जिल्ह्यात सद्य:स्थितीत पश्चिम भागात जोरदार अतिवृष्टी होत आहे. जिल्ह्यातील सर्व धरातून पाण्याचा विसर्ग नदी पात्रात होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सातारा जिल्ह्यात पुढील काही दिवस अतिवृष्टी होणार आहे. सातारा जिल्ह्यात सध्या चालू असलेल्या अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यातील मिरगाव, आंबेघर, हुंबरळी, ढोकावळे या ठिकाणी भूस्खलन झाले आसून, यामध्ये मोठ्या प्रमाणावर जिवित व वित्त हानी झालेली आहे.

सद्य:स्थितीत मिरगाव येथील एक मयत व्यक्ती आढळून आलेली आहे. तथापी, भूस्खलनाखाली व्यक्ती गाडल्या गेलेल्या असल्यामुळे निश्चित संख्या सांगता येत नाही. या ठिकाणी एनडीआरएफचे एक पथक आणि स्थानिक प्रशासन, नागरिकांच्यातर्फे युध्दपातळीवर शोध व बचावकार्य चालू आहे. जावली तालुक्यातील रेंगडी गावामध्ये दोन व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून बेपत्ता आहेत व दोन व्यक्ती मयत झालेल्या आहेत. तसेच वाई तालुक्यातील कोंढवळे येथे पाच घरे पूर्णपणे मातीच्या ढिगाऱ्यात दबली गेलेली असून सद्य:स्थितीत दोन व्यक्ती मयत आढळून आलेल्या आहेत. या ढिगाऱ्यात अडकलेल्या 27 नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. जोर याठिकाणी दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. 

महाबळेश्वर तालुक्यामध्ये 594.04 मिलिमीटर इतका विक्रमी पाऊस झाल्यामुळे बऱ्याचशा गावाचा संपर्क तुटला असून धावरी या ठिकाणी एक व्यक्तीचा मृत्यू झाला आह. पावसामुळे मोठ्या प्रमाणावर घरांचे व शेतीपिकांचे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले आहे. जिल्ह्यात एक अतिरिक्त एनडीआरएफचे पथक आज सायंकाळपर्यंत दाखल होणार असून यामुळे जिल्ह्यात होणाऱ्या अतिवृष्टीमध्ये तात्काळ शोध व बचावकार्यास मदत होणार आहे. अतिवृष्टीमुळे नागरिकांनी पुढील प्रमाणे काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनमार्फत करण्यात आले आहे. 

कोणत्याही परिस्थितीत नागरिकांनी पुराच्या पाण्यात प्रवेश करु नये. नदीपात्राच्या कडेला अथवा धोक्याच्या ठिकाणी वास्तव्यास असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हावे. मुसळधार पावसासत आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. जुन्या मोडकळीस आलेल्या घरात  अथवा इमारतीत आश्रय घेऊ नये. नदी नाल्याच्या पुलावरुन पाणी वाहत असल्यास कोणतही परिस्थितीत पूल ओलांडू नये. अफवांवर विश्वास ठेऊ नये आणि अफवा पररवू नयेत असे, आवाहनही प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com