या कारणांमुळे उदयनराजे, संभाजीराजेंची भेट टळली.... - Due to these reasons, the meeting of MP Udayanraje and MP Sambhaji Raje was avoided .... | Politics Marathi News - Sarkarnama

या कारणांमुळे उदयनराजे, संभाजीराजेंची भेट टळली....

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 11 जून 2021

माझी काही नियोजित ठरलेली कामे असल्याने मला त्यांना भेटता येणार नाही. या गोष्टीचा कोणी चुकीचा अर्थ काढू नये. येत्या दोन चार दिवसांत आमची भेट होईल. या भेटीनंतर आम्ही आरक्षण आंदोलनाबाबत चर्चा करून निर्णय घेऊ. 

सातारा : मराठा आरक्षण प्रश्नी कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती Sambhajiraje Chhatrapati यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर ते साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले MP Udayanraje Bhosale यांची भेट घेणार होते. यासंदर्भात आज साताऱ्यात पत्रकारांनी उदयनराजेंशी संवाद साधला. यावेळी उदयनराजे म्हणाले, संभाजीराजे हे माझे भाऊ असून त्यांच्या प्रत्येक गोष्टीत मी त्यांच्यासमवेत आहे. येत्या दोन चार दिवसांत आमची भेट होईल, असे स्पष्ट केले. Due to these reasons, the meeting of MP Udayanraje and MP Sambhaji Raje was avoided ....

कोल्हापूर येथे भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलनाची भूमिका काल स्पष्ट केली. यावेळी त्यांनी या आंदोलनासाठी आपण साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचीही भेट घेणार असे नमुद केले होते. त्यामुळे संभाजीराजे व उदयनराजेंच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.  

हेही वाचा : मृत्यूंची आकडेवारी लपवून अपयश झाकण्याचा प्रयत्न, विखे पाटलांना शंका

या दोन नेत्यांची पुण्यात भेट होऊन आंदोलनासंदर्भात चर्चा होणार होती. मात्र, काही कारणास्तव खासदार उदयनराजे भोसले आज पुण्याला गेले नाहीत. त्यामुळे त्यांची भेट कधी होणार याविषयीची उत्सुकता ताणली होती. मात्र, आज जलमंदीर पॅलेस येथे पत्रकारांशी बोलताना उदयनराजेंनी आपली बाजू स्पष्ट केली.

आवश्य वाचा : आमची दोस्ती जंगलातील वाघाशी होती; पिंजऱ्यातील नव्हे : चंद्रकांतदादांचा शिवसेनेला चिमटा

खासदार उदयनराजे म्हणाले, संभाजीराजे माझे भाऊ आहेत. त्यांच्या प्रत्येक गोष्टीत मी त्यांच्यासमवेत आहे. माझी काही नियोजित ठरलेली कामे असल्याने मला त्यांना भेटता येणार नाही. या गोष्टीचा कोणी चुकीचा अर्थ काढू नये. येत्या दोन चार दिवसांत आमची भेट होईल. या भेटीनंतर आम्ही आरक्षण आंदोलनाबाबत चर्चा करून निर्णय घेऊ. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख