काळजी करू नका, मी पुन्हा आपल्यासोबत कार्यरत होईन : राजू शेट्टी - do not worry i will active soon Says Raju shetty | Politics Marathi News - Sarkarnama

काळजी करू नका, मी पुन्हा आपल्यासोबत कार्यरत होईन : राजू शेट्टी

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

गेल्या पंधरा दिवसातील दौ-यामुळे शारिरीक थकवा निर्माण झाला होता. आज सकाळी अचानक त्यांच्या ई.सी.जी.मध्ये बदल निर्माण झाल्याने प्रकृती खालावली होती. यामुळे त्यांना तातडीने अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते.

 सातारा : दिनानाथ रुग्णालयातील दिवसभरात झालेल्या उपचारामुळे सध्या माझी तब्येत स्थिर असून चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी कोणतीही काळजी करू नये. थोड्याशा विश्रांतीनंतर  लवकरच मी पुन्हा आपल्यासोबत कार्यरत होईन, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांन केले आहे. 

राजू शेटटी यांना गेल्या महिन्यात कोरोनामुक्त झाल्यानंतर शरिरात झालेल्या कोरोनाच्या दुष्परिणामामुळे तीन महिन्याच्यी सक्तीची विश्रांती घेणेबाबत दिनानाथ हॉस्पीटल मधील डॉक्टरांनी सुचित केले होते. पण पंधरा दिवसांपूर्वी राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मराठवाड, विदर्भ व कोकणचा दौरा त्यांनी केला.

यामध्ये थोडी अस्वस्थता जाणवू लागली होती. दोन तीन दिवसापूर्वी डॉक्टरांना भेटून तपासणी करणार होते. मात्र, पंजाब व हरियाणा येथे शेतकरी आंदोलनातील निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पंजाब व हरियाणा येथील आंदोलनानंतर तपासणी करण्याचा निर्णय घेऊन तीन दिवसाचा दौरा करून आज सकाळी तपासणीसाठी ते पुणे येथील दीनानाथ हॉस्पीटलमध्ये दाखल झाले.

गेल्या पंधरा दिवसातील दौ-यामुळे शारिरीक थकवा निर्माण झाला होता. आज सकाळी अचानक त्यांच्या ई.सी.जी.मध्ये बदल निर्माण झाल्याने प्रकृती खालावली होती. यामुळे त्यांना तातडीने अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते.

रुग्णालयात दिवसभरात झालेल्या उपचारामुळे माझी तब्येत स्थिर असून चिंता करण्याचे कोणतेच कारण नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना माझी विनंती आहे. त्यांनी काळजी करू नये. थोड्याशा विश्रांतीनंतर लवकरच मी आपल्यासोबत पुन्हा कार्यरत होईन, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख