गरज नसताना रेमडेसिवरचा आग्रह धरू नका; विनाकारण एचआरसीटी करून आर्थिक नुकसान टाळा

महाराष्ट्रामध्ये रेमडेसिवर बाबतीत खूप काळाबाजार सुरू आहे. यापासूनही आपण सावध राहणे गरजेचे आहे. रामराजे म्हणाले, खऱ्या अर्थाने कोरोना या संसर्गजन्य आजाराला दूर ठेवायचे असेल व कोरोनाची साखळी तोडावयाची असेल तर आपण एकमेकांच्या संपर्कात येणे टाळावे. मास्क घालावा, सॅनिटायझरचा उपयोग करावा व प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.
Do not insist on a remediver when not needed; Avoid financial loss by doing HRCT unnecessarily
Do not insist on a remediver when not needed; Avoid financial loss by doing HRCT unnecessarily

सातारा : ज्या रुग्णांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. असे सर्व रुग्ण एचआरसीटी करण्यासाठी सी.टी. स्कॅन सेंटरवर गर्दी करत आहेत. सरसकट कोरोना रुग्णांनी सिटी स्कॅन करण्याची गरज नाही. ज्या रुग्णांना दम लागतोय, अस्वस्थपणा असेल, तसेच भरपूर ताप असेल आणि ज्यांची ऑक्सिजन लेवल 95 च्या खाली आहे, अशा रुग्णांनीच एचआरसीटी करावी. ज्यांना अशी लक्षणे जाणवत नाहीत, त्यांनी एचआरसीटी करून आपले आर्थिक नुकसान व सेंटरवरील होणारी गर्दी टाळावी, असे आवाहन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.

कोरोनाच्या या काळामध्ये प्रत्येकाने आपल्या घरी एक पल्स ऑक्सिमीटर ठेवणे गरजेचे आहे. ज्यामुळे आपल्या शरीरातील ऑक्सिजनची लेव्हल घरच्या घरी समजेल, असे सांगून रामराजे नाईक निंबाळकर यांनी म्हटले की, जर एचआरसीटीमध्ये आपला स्कोर जर सातच्या आत असेल तर आपण घरी अथवा शासनाच्या विलगीकरण कक्षामध्ये राहणे पसंत करावे. स्कोर सातच्या पुढे व १५ च्या आत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने दवाखान्यात जावे व कोणती औषधे घ्यावीत, ते ठरवावे. 

ज्यांचा एचआरसीटी स्कोर- १५ च्या पुढे असेल तरच अशा रुग्णांनी ऑक्सिजन बेड व व्हेंन्टिलेटर बेड असणाऱ्या रुग्णालयांत अॅडमिट व्हावे. डॉक्टरांच्या सल्ल्याने रेमडेसिवर इंजेक्शन घ्यावयाचे की नाही ते ठरवावे. कारण जागतिक आरोग्य संस्थेने देखील रेमडेसिवर इंजेक्शन म्हणजे रामबाण उपाय नाही, असे सांगितले आहे. त्यामुळे उगीचच गरज नसताना रेमडेसिवर घेण्यासाठी डॉक्टरांच्याकडे आग्रह धरू नका. त्यामुळेच रेमडेसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे.

त्यामुळे महाराष्ट्रामध्ये रेमडेसिवर बाबतीत खूप काळाबाजार सुरू आहे. यापासूनही आपण सावध राहणे गरजेचे आहे. रामराजे म्हणाले, खऱ्या अर्थाने कोरोना या संसर्गजन्य आजाराला दूर ठेवायचे असेल व कोरोनाची साखळी तोडावयाची असेल तर आपण एकमेकांच्या संपर्कात येणे टाळावे. मास्क घालावा, सॅनिटायझरचा उपयोग करावा व प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com