मंत्री विजय वडेट्टीवारांना बडतर्फ करा; मराठा क्रांती मोर्चाचे निवेदन  

समाजा-समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य करत असल्याबद्दल मंत्रीमंडळातून तात्काळ बडतर्फ करण्यात यावे. अन्यथा सामाजिक सलोखा बिघडल्यास तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास यास राज्य सरकार जबाबदार असेल, असाही इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.
मंत्री विजय वडेट्टीवारांना बडतर्फ करा; मराठा क्रांती मोर्चाचे निवेदन  
Dismiss Minister Vijay Vadettiwar; Statement of Maratha Kranti Morcha to the Chief Minister

कऱ्हाड : बेजबाबदार वक्तव्य करुन सामाजिक शांततेचा भंग होईल, अशी भाषा वापरणारे मंत्री विजय वडेट्टीवार यांना तात्काळ बडतर्फ करावे. सतत मराठाविरोधी वक्तव्य करत असल्याबद्दल वडेट्टीवार यांची मराठा आरक्षण उपसमितीवरुन हकालपट्टी करावी, अशी मागणी कऱ्हाड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मुख्यमंत्री यांच्याकडे तहसीलदारांना निवेदन देवुन करण्यात आली. Dismiss Minister Vijay Vadettiwar; Statement of Maratha Kranti Morcha to the Chief Minister

यासंदर्भातील निवेदनात मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले की, सोलापुर येथे ओबीसी मेळाव्यात बोलताना मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दोन समाजात जातीय तेढ निर्माण करण्याच्या हेतूने, आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांचे वंशज खासदार छत्रपती संभाजीराजे यांना उद्देशून आणि संसद सदस्याच्या जीवित्तास धोका निर्माण करण्यासाठी प्रक्षोभक व भडकाऊ वक्तव्य करून उपस्थित समुदायाला हिंसा करण्यास चिथावणी दिली. 

आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज खासदार संभाजीराजे छत्रपती यांची जनतेतील प्रतिमा मलिन करून बदनामी केली जात आहे. यापूर्वी अनेकवेळा मराठा समाजात संताप निर्माण होईल, अशी मराठाविरोधी वक्तव्य संबंधीत मंत्री यांनी केली आहेत. अशा या मराठाव्देषी मंत्र्यांना मराठा आरक्षण उपसमिती मधून तात्काळ हटवण्यात यावे.

समाजा-समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य करत असल्याबद्दल मंत्रीमंडळातून तात्काळ बडतर्फ करण्यात यावे. अन्यथा सामाजिक सलोखा बिघडल्यास तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास यास राज्य सरकार जबाबदार असेल, असाही इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.
 
Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in