अलमट्टीप्रकरणी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी शनिवारी चर्चा.....  - Discussion with Karnataka Chief Minister on Almatti Dam on Saturday says Minister Jayant Patil | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

अलमट्टीप्रकरणी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी शनिवारी चर्चा..... 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 17 जून 2021

 

कमीत कमी कसं नुकसान होईल आणि पूरनियंत्रणाचं काम दोन्ही राज्यांच्या समन्वयाने कसं चांगलं होईल. यादृष्टीने ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. 

मुंबई : अलमट्टी धरणातून Almatti Dam होणार्‍या पाण्याच्या विसर्गामुळे पूरपरिस्थितीला सामोरे जावे लागते. त्यामुळे या पूरनियंत्रणाचं काम महाराष्ट्र Maharashtra व कर्नाटक Karnataka या दोन्ही राज्यांच्या समन्वयाने कसं चांगलं होईल, यादृष्टीने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी शनिवारी सकाळी साडे दहा वाजता बैठक होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील Jayant Patil यांनी दिली. Discussion with Karnataka Chief Minister on Almatti Dam on Saturday says Minister Jayant Patil

जलसंपदा विभागाचे सचिव आणि अधिकारी यांना घेऊन ही चर्चा होणार आहे. ही थेट चर्चा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी होणार आहे. त्यासाठी त्यांनी शनिवारी सकाळी साडे दहा वाजताची वेळ दिल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले. कृष्णा नदीचा महापूर आणि त्यातून अलमट्टीच्या पाण्याचे नियोजन, महाराष्ट्रातल्या कृष्णा खोऱ्यातील व कर्नाटकच्या कृष्णा खोऱ्यातील जनतेला जे नुकसान सोसावे लागते. 

हेही वाचा : मर्जीतील लोकांना दिले शिवभोजनचे कंत्राट, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार...

त्यापासून कमीत कमी कसं नुकसान होईल आणि पूरनियंत्रणाचं काम दोन्ही राज्यांच्या समन्वयाने कसं चांगलं होईल. यादृष्टीने ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. यापूर्वी सचिव स्तरावर बैठक पार पडली आहे आणि आता मंत्री स्तरावर होत आहे. शेजारील राज्याशी संवाद चांगला कसा होईल, हा प्रयत्न असणार आहे, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख